(फोटो सौजन्य - अकाउंट)
अक्षय कुमार, आर माधवन आणि अनन्या पांडे यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘केसरी चॅप्टर २: द अनटोल्ड स्टोरी ऑफ जालियनवाला बाग’ १८ एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. रिलीजपूर्वी, बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी एक खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते, जिथे अक्षय कुमारने चाहत्यांना भावनिक आवाहन केले. हा चित्रपट भारतीय इतिहासातील सर्वात वेदनादायक पानांपैकी एक आहे, जो १३ एप्रिल १९१९ रोजी झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाची कहाणी सांगतो. अक्षय कुमार या चित्रपटाबद्दल काय म्हणाला हे आपण जाणून घेणार आहोत.
अक्षयने चाहत्यांना भावनिक आवाहन केले
माध्यमांशी बोलताना अक्षय कुमार म्हणाला, “जेव्हा तुम्ही हा चित्रपट पाहायला याल तेव्हा सुरुवात चुकवू नका. हा माझ्या सर्वात महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक आहे. पहिले १० मिनिटे या चित्रपटासाठी खूप महत्वाचे आहे. मला खात्री आहे की ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करेल. ज्यांनी हा चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला त्यांना कळेल की हा चित्रपट योग्य वेळी आला आहे.”
Karan Johar: ५२ वर्षीय करण जोहरने १७ किलो वजन का केले कमी? निर्मात्याने स्वतःच केला खुलासा!
दिल्ली स्क्रिनिंगमध्ये अभिनेत्याने मांडले मत
याआधी, दिल्लीत झालेल्या दुसऱ्या स्क्रिनिंग दरम्यान, अक्षयने प्रेक्षकांना आणखी एक खास विनंती केली होती. तो म्हणाला होता, “मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही तुमचे फोन खिशात ठेवा आणि चित्रपटातील प्रत्येक संवाद काळजीपूर्वक ऐका. त्याचा आमच्यासाठी खूप अर्थ आहे. जर तुम्ही चित्रपटाच्या मध्यभागी इंस्टाग्राम तपासलात तर ते चित्रपटाचा अपमान होईल. कृपया तुमचे फोन दूर ठेवा.” असं तो म्हणाला.
‘केसरी चॅप्टर २’ ची काय आहे कथा?
या चित्रपटात अक्षय कुमार सी शंकरन नायरची भूमिका साकारत आहे. जालियनवाला बाग हत्याकांडातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध कायदेशीर लढा दिला. आर माधवन आणि अनन्या पांडे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १९१९ मधील त्या काळ्या दिवसानंतर घडलेल्या घटनांची कहाणी उघड करणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. तसेच हा चित्रपट आज सर्व चित्रपटगृहात रिलीज झाला आहे.
वादाच्या भोवऱ्यात पुन्हा अडकला ‘Jaat’, सनी देओलच्या चित्रपटावर एफआयआर दाखल!
करण सिंह त्यागी यांनी हा चित्रपट बनवला
‘केसरी चॅप्टर २’ चे दिग्दर्शन करण सिंग त्यागी यांनी केले आहे, तर करण जोहर त्याचे निर्माते आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच खूप चर्चेत होता. विशेषतः जेव्हा त्यागीने एका माहितीपटाचा उल्लेख केला. या माहितीपटात, जनरल डायरच्या पणतीने या हत्याकांडाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला आणि नि:शस्त्र लोकांना लुटारू म्हटले. त्यागी यांनी हे मत चुकीचे आणि त्रासदायक असल्याचे म्हटले होते.