
फोटो सौजन्य - Social Media
सिनेमाच्या शूटिंगदरम्यान Kiara Adwani सिनेमासाठी Intimate seen देण्यास तयार होती. तिची संमती आणि कम्फर्ट लक्षात घेऊन पुढे शूट करण्यात आले. पण जेव्हा Kiara ने Toxic On Screen पाहिला तेव्हा तिची मत बदलली असल्याचे दिसून येत आहे. Shooting दरम्यान जरी तिच्या Comfort ची काळजी घेतली गेली असली तर On Screen सादरीकरणावर अभिनेत्री नाराज आहे. प्रेक्षकांना ते सगळं कसं दिसेल याचा विचार करिता तिने सहकलाकार यश आणि दिग्दर्शक गीतू मोहनदासशी याबाबत चर्चा केली आहे. तसेच त्यात बदल करण्याची किंवा त्याची वेळ कमी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, ‘Toxic: The Fairytale For Grown Ups’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतही बदल झाले आहेत. सुरुवातीला 19 मार्च रोजी रिलीज होणार असलेला हा सिनेमा नंतर 4 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आला. मात्र, आता पुन्हा एकदा त्याच्या रिलीजमध्ये विलंब झाला आहे. निर्मात्यांच्या मते, जागतिक स्तरावर अधिक व्यापक आणि प्रभावी रिलीज करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या चित्रपटात कियारा अडवाणी आणि यश यांच्यासोबत नयनतारा, हुमा कुरेशी, रुक्मिणी वसंत आणि तारा सुतारिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. मोठ्या स्टारकास्टमुळे आणि भव्य निर्मितीमुळे हा चित्रपट आधीपासूनच चर्चेत आहे. एकंदरीत, ‘Toxic’ हा चित्रपट रिलीजपूर्वीच वाद आणि चर्चांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. Kiara Adwani ने तिच्या या मागणीबाबत अद्याप अधिकृत प्रतिकिया नोंदवली नाही. दरम्यान, इंटिमेट सीनबाबतची ही चर्चा कितपत खरी आहे, हे अधिकृत विधान आल्यानंतरच स्पष्ट होईल. मात्र, या सगळ्या घडामोडींमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे, हे नक्की.