(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
साऊथ अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शन अभिनीत ‘लोका: चॅप्टर १ चंद्रा’ या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने फक्त १ दिवसात २.६ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करून नवा रेकॉर्ड बनवला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने केवळ केरळमध्येच नव्हे तर देशभरात चांगली ओपनिंग केली आहे. मल्याळम चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, हा आकडा अलिकडच्या काळातील सर्वोत्तम मानला जात आहे. तसेच या चित्रपटाला प्रेक्षकांचा पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
‘लोका’चा चित्रपटाने केली कमाल
‘लोका: चॅप्टर १ चंद्रा’ने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच दिवशी, मल्याळम आवृत्तीने ₹२.६ कोटींचे कलेक्शन केले आहे, जो या वर्षीच्या इतर कोणत्याही टॉलिवूड रिलीजच्या तुलनेत एक चांगली सुरुवात आहे. तसेच या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड देखील मोडले आहेत. आणि स्वतःचे अव्वल स्थान निर्माण केले आहे.
कथा आणि स्टारकास्टचे झाले कौतुक
‘लोका: चॅप्टर १’ या चित्रपटात कल्याण प्रियदर्शन मुख्य भूमिकेत आहे आणि तिच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. समीक्षकांच्या मते, चित्रपटाची पटकथा, दृश्य सादरीकरण आणि संगीत देखील प्रेक्षकांना आवडले आहे. तसेच चित्रपटामधील संपूर्ण स्टारकास्ट काम अप्रतिम आहे आणि ते प्रेक्षकांना आवडत आहे. आता हा चित्रपट पुढे आणखी चांगली कमाई करणार आहे याच शंकाच नाही.
चित्रपटाची ऑक्युपन्सी किती ?
संध्याकाळपासून चित्रपटाची ऑक्युपन्सी (४२.५%) वाढू लागली आणि रात्रीपर्यंत ती ७०% ऑक्युपन्सी झाली. कोचीमध्ये सर्वाधिक प्रेक्षकसंख्या होती जिथे ६१% लोक चित्रपट पाहण्यासाठी सामील झाले. ११४ स्क्रीनिंगमध्ये चित्रपटाची ऑक्युपन्सी ९५% होती. तिरुअनंतपुरममध्ये ४१.७५%, बेंगळुरूमध्ये ३६% आणि चेन्नईमध्ये २७% ऑक्युपन्सी होती. आता हा चित्रपट पुढे किती कमाई करतो आणि काय धुमाकूळ घालतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.