(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
७१ वर्षीय मदन बॉब हे बऱ्याच काळापासून कर्करोगाने ग्रस्त होते. कर्करोगाशी झुंज देत असताना शनिवारी त्यांचे निधन झाल्याचे अभिनेत्याच्या कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले. तमिळ चित्रपटांमध्ये ते त्यांच्या आनंदी चेहऱ्यासाठी आणि हास्यासाठी ओळखले जात होते. मदन बॉब यांनी अनेक प्रसिद्ध दक्षिण भारतीय कलाकारांसोबतही काम केले होते. त्यांनी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करून हिट चित्रपट दिले आहेत.
प्रभु देवा यांनी वाहिली श्रद्धांजली
प्रभू देवा यांनी त्यांच्या सोशल मीडियावर त्यांचा फोटो शेअर करून अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आम्ही एकत्र स्क्रीन शेअर केली. त्यांच्या उपस्थितीने सेटवर नेहमीच आनंद आणला. त्यांच्या आनंदी स्वभावामुळे ते नेहमीच त्यांच्या सभोवतालच्या लोकांना आनंदी करत असत. त्यांच्या कुटुंबियांना मनापासून श्रद्धांजली. ते नेहमीच लक्षात राहतील.’ असे लिहून अभिनेत्याने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
We shared the screen, and his presence always brought joy to the set.
Cheerful, kind, and full of humour he made everyone feel happy around him.
Heartfelt condolences to his family.
He’ll always be remembered 🙏 pic.twitter.com/Ji5sqMlsDW— Prabhudheva (@PDdancing) August 2, 2025
रजनीकांत-कमल हासन यांच्यासोबत केले काम
मदन बॉबचे खरे नाव एस कृष्णमूर्ती होते. त्यांनी कमल हासन, रजनीकांत, अजित कुमार, सूर्या सारख्या प्रसिद्ध दाक्षिणात्य सुपरस्टार्ससोबत काम केले आहे. ते ‘असथा पोवाथु यारू?’ या लोकप्रिय तमिळ कॉमेडी शोमध्ये जज म्हणूनही दिसले. मदन बॉब हे फक्त अभिनयासाठी ओळखले जात नव्हते, तर ते एक उत्तम संगीतकार देखील होते.
या चित्रपटांमध्ये अभिनेत्याने केले काम
मदन बॉबने ‘तेनाली’ आणि ‘फ्रेंड्स’ सारख्या तमिळ चित्रपटांमध्ये लोकप्रिय भूमिका साकारल्या होत्या. अभिनेता त्याच्या विनोदाने प्रेक्षकांना हसवत असे. अभिनेत्याच्या मृत्यूच्या बातमीने चाहते खूप निराश झाले आहेत. चाहत्यांपासून ते तमिळ चित्रपट कलाकारांपर्यंत सर्वजण सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अभिनेत्याचे अंतिम संस्कार कधी होतील याची माहिती कुटुंबाने अद्याप शेअर केलेली नाही. परंतु त्यांचे कुटुंब देखील शोक व्यक्त करत आहे.