(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
चेन्नई येथे झालेल्या ‘कुली’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात, बॉलीवूड मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचे पाय स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि या व्हिडीओने आता चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. अभिनेत्याची ही कृती पाहिल्यानंतर आता सर्वजण त्यांचे कौतुक करत आहेत. अभिनेत्याचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चर्चेत आहे. तसेच चाहते या व्हिडीओला भरभरून प्रतिसाद देत आहेत.
या चित्रपटात आमिर खान साकारणार ही भूमिका
‘कुली’ या चित्रपटात आमिर खान एक छोटीशी भूमिका साकारत आहे, तर या गँगस्टर ड्रामामध्ये रजनीकांत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केले आहे, ज्यांच्यासोबत आमिर आणखी एक मोठा चित्रपटही करणार आहे. या निमित्ताने आमिरचा रजनीकांतबद्दलचा आदर स्पष्टपणे दिसून आला. या कार्यक्रमाचा व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होत आहे. आमिर खानने या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान अभिनेते रजनीकांत यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले.
‘पती पत्नी और पंगा’ स्क्रिप्टेड आहे का शो? रुबिना दिलैक म्हणाली, ‘त्यावर तुम्ही जोर…’
स्क्रिप्ट न ऐकता रजनीकांतसाठी काम करण्यास दिला होणार
झूमशी दिलेल्या मुलाखतीदरम्यान, आमिर खानने सांगितले की जेव्हा लोकेश कनगरजने त्यांना ‘कुली’ मध्ये कॅमिओ करण्याची ऑफर दिली तेव्हा त्यांनी पटकथेचा एकही शब्द न ऐकता लगेच होकार दिला. अभिनेता म्हणाला, ‘हा रजनी सरांचा चित्रपट आहे, आणि त्यात मी कोणतीही भूमिका करण्यास तयार आहे.’ पापाराझी पेज ‘ताहिर जासूस’ ने इन्स्टाग्राम हा व्हिडिओ शेअर केला आहे.
लोकेशसोबत लवकरच आणखी एक चित्रपट
आमिरने एका मुलाखतीत पुष्टी केली की तो लोकेश कनागराजसोबत एक पूर्ण-प्रमाणात चित्रपट करणार आहे, जो ‘कायथी’ नंतर सुरू होणार आहे. त्याने सांगितले की हा प्रकल्प पुढील वर्षाच्या उत्तरार्धात फ्लोरवर जाणार आहे. याचा अर्थ असा की आमिर दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शकांशी त्याचे नाते मजबूत करत आहे.
‘कुली’ची स्टारकास्ट
रजनीकांत आणि आमिर व्यतिरिक्त, नागार्जुन, सत्यराज, उपेंद्र, श्रुती हासन आणि सौबिन शाहीर सारखे कलाकार देखील ‘कुली’चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ रोजी तमिळ, हिंदी, तेलगू आणि कन्नड भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.