(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूडमध्ये ‘धक धक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित आज जरी यशस्वी अभिनेत्री असली, तरी तिचा प्रवास सुरुवातीला खूपच खडतर होता. माधुरीच्या करिअरची सुरुवात काहीशी निराशाजनक ठरली. तिच्या सुरुवातीच्या अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. चार वर्षांच्या प्रयत्नांनंतर, 1988 साली आलेल्या ‘तेजाब’ या चित्रपटाने तिच्या आयुष्याला कलाटणी दिली. ‘एक दो तीन’ गाण्यातील तिच्या मोहिनीच्या भूमिकेने तिला रातोरात स्टार बनवलं पण कधी कधी असे प्रसंग आले की तिला सेटवर डोळ्यांत अश्रू घेऊन काम करावं लागलं.९०च्या काळात तिने अनेक चित्रपटांत काम करत तिच्या सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने अनेकांची मनं जिंकली. आजही तिची क्रेझ कायम आहे. त्यावेळी तिने अनेक चित्रपटांत काम केलेलं. परंतु, एकदा माधुरीला दिग्दर्शकाने चित्रपटातून काढण्याची धमकी देण्यात आली होती.
माधुरीला दिग्दर्शकाने चित्रपटातील एका सीनसाठी ब्लाऊज काढावा लागणार असल्याचं सांगितलं होतं. परंतु, तिनं असं करण्यास नकार दिल्यानं त्यांनी तिला हा सीन कर किंवा चित्रपटातून बाहेर पड, असं म्हटलेलं. हा चित्रपट होता(shanakht)या चित्रपटाते दिग्दर्शन टिनू आनंद यांनी केलं होतं. त्यामध्ये अमिताभ बच्चन आणि माधुरी मुख्य भूमिकांत झळकलेले. जेव्हा टिनू आनंद यांनी तिला सीन समजावला तेव्हा तिनं त्यासाठी होकार दिलेला.
राखी सावंत पुन्हा चर्चेत; म्हणाली, “बुर्ज खलीफामध्ये 4‑5 फ्लॅट्स, डोनाल्ड ट्रम्प माझे वडील आहेत!”
‘रेडिओ नशा’ला दिलेल्या मुलाखतीत टिनू आनंद यांनी याबद्दल सांगितलेलं. ते म्हणालेले, “मी तिला सुरुवातीलाच सांगितलेलं. त्यातील सीनसाठी ब्लाऊज काढावा लागेल. तिनं ब्रा घातलेली असेल आणि त्यावर सीन शूट होणार. तिच्यापासून काहीही लपवण्यात आलेलं नव्हतं. कथानकाची तशी गरज होती. मी तिला असंही सांगितलेलं की, शूटिंगच्या पहिल्याच दिवशी तो सीन शूट होणार आहे”.
लग्नाआधी ८ महिन्यांची लिव्ह-इन स्टोरी; सैफ-अमृताच्या नात्यामागचं गूढ उलगडलं
दिग्दर्शकाने पुढे सांगितलेलं की, “शूटिंगच्या पहिल्या दिवशी जेव्हा तो सीन शूट करायचा होता तेव्हा तिनं नकार दिला. मी तिला विचारलं की, काय झालं तर तिनं सांगितलं की, टिनू मला हा सीन करायचा नाहीये. तेव्हा मी म्हणालेलो की, सॉरी! पण तुला तो करावाच लागेल. नाही तर तू या चित्रपटातून बाहेर पड. यावर अमिताभ बच्चन म्हणालेले, जाऊ दे ना, कशाला वाद वाढवताय. तिला नसेल करायचा सीन. तेव्हा मी म्हणालो की, तसं तिनं आधीच सांगायला हवं होतं.” यानंतर माधुरीच्या सेक्रेटरीनं टिनू आनंद यांना भेटून सांगितले की ती हा सीन शूट करायला तयार आहे,या नंतर चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करण्यात आले, पण बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने यश मिळवलं नाही त्यामुळे हा चित्रपट फ्लॉप ठरला.