(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेले काही महिने ती मीडियापासून दूर होती आणि भारताबाहेर, विशेषतः दुबईमध्ये वास्तव्यास होती. सोशल मीडियावर मात्र ती नियमितपणे सक्रिय असल्याचे दिसत होते.आपल्या जिम व्हिडीओज, जुने डान्स क्लिप्स, आणि वेगवेगळे रील्स पोस्ट करत ती आपल्या चाहत्यांशी संपर्कात होती.
मात्र, मुंबईत परतल्यानंतर ती पुन्हा एकदा तिच्या विचित्र आणि गमतीशीर विधानांमुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच एका व्हिडीओमध्ये राखी सावंतने काही तिच्या वक्तव्यांने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.
राखी म्हणाली“माझे बुर्ज खलीफा मध्ये 4‑5 फ्लॅट्स असून माझे 200 बॉडीगार्ड्स आहेत.” आणि सगळ्यात आश्चर्यजनक विधान म्हणजे, “डोनाल्ड ट्रम्प माझे वडील आहेत!”
लग्नाआधी ८ महिन्यांची लिव्ह-इन स्टोरी; सैफ-अमृताच्या नात्यामागचं गूढ उलगडलं
या वक्तव्यानंतर तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यावर नेटकऱ्यांकडून मिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण याला मनोरंजन म्हणून पाहत आहेत, तर काहीजण तिच्या विधानांवर टीका करत आहेत.राखी सावंतचा हा अंदाज पुन्हा एकदा तिच्या “कंट्रोव्हर्सी क्वीन” या ओळखीला न्याय देतो, असं म्हणावं लागेल.
रामायण चित्रपटाचे शूटिंग पूर्ण, पुढील ३०० दिवस अनेक कंपन्या VFX वर करणार काम
राखी सावंत पुन्हा एकदा तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजात मीडियासमोर आली असून, तिचे नवीन व्हिडीओज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.राखीने एका व्हिडिओमध्ये ‘बिग बॉस १९’मध्ये एंट्री होणार असल्याचं सांगितलं. तिनं असंही म्हटलं की,“मी बिग बॉस हाऊसमध्ये जबरदस्त धमाका करणार आहे!”या वर्षाच्या सुरुवातीला तिने दावा केला होता की, ती लवकरच एका पाकिस्तानी अभिनेत्याशी लग्न करणार आहे आणि पाकिस्तानला जाणार आहे. यावर बरीच चर्चा झाली, मात्र नंतर तिनं स्वतः सांगितलं की,“तो सगळा प्रकार फक्त पब्लिसिटी स्टंट होता.”राखी लवकरच ‘पति, पत्नी और पंगा’ या टीव्ही शोमध्ये दिसणार आहे, अशी माहिती मिळत आहे.