(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूडमधील चर्चित कपल सैफ अली खान आणि अमृता सिंह यांच्या प्रेमकथेपासून ते घटस्फोटापर्यंत सर्व गोष्टी आजही चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरतात. 1991 मध्ये लग्न करणाऱ्या या जोडप्याला सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन अपत्यं आहेत. मात्र, काही वर्षांतच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
पण या नात्याबद्दल एक अविस्मरणीय आणि फारसं माहीत नसलेलं सत्य समोर आलं आहे. सैफ आणि अमृता यांनी लग्नापूर्वी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते आणि त्यांनी कुटुंबीयांना न सांगता गुपचूप लग्न केलं होतं.
या सिक्रेट लग्नाविषयी ज्येष्ठ फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी एका मुलाखतीत उघड केलं आहे. त्यांनी सांगितलं की, “सैफ आणि अमृताने लग्नाचं कोणालाही आधी सांगितलं नव्हतं. आमच्यासकट सगळेच थोडे आश्चर्यचकित झाले होते. पण त्या दोघांमध्ये एक वेगळीच केमिस्ट्री होती.”
नम्रता झकारिया यांच्याशी बोलताना अबू जानी आणि संदीप खोसला म्हणाले, “आम्ही साक्षीदार म्हणून सैफ आणि अमृता यांच्यावरील निकाहनाम्यावर स्वाक्षरी केली होती. एक दिवस ते आमच्याकडे आले आणि सांगितले की ते लग्न करू इच्छितात. ते दोघे प्रेमात होते आणि जवळपास सहा ते आठ महिने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होते. सैफ लग्नासाठी पूर्णपणे तयार होता, पण अमृता मात्र संकोचलेल्या अवस्थेत होती”.
रामायण चित्रपटाचे शूटिंग पूर्ण, पुढील ३०० दिवस अनेक कंपन्या VFX वर करणार काम
संदीप खोसला आणि अबू जानी पुढे म्हणाले, ” त्यावेळी मौलवी आणि सरदारजी पंडित यांना बोलावलेलं. अमृता तिला जमलं तशी ती तयार झालेली. कारण- त्यावेळी घाईघाईत फार काही नव्हतं. सुदैवानं तिच्याकडे तिच्या आईचे सुंदर दागिने होते. दोघेही तयार झाले आणि तेव्हा मौलवींनी विचारलं की, तुझं नाव काय आहे. तुझं नाव अ अक्षरावरून सुरू व्हायला हवं. आम्ही सगळे एकमेकांकडे बघायला लागलो आणि तेव्हा तिथे असलेले पंडित म्हणाले, अझिझा. ते सगळं खूप घाईघाईत झालेलं; पण शेवटी सगळ्यांनी त्याचा स्वीकार केला.”
दरम्यान, सैफ आणि अमृता यांनी लग्न केल्यानंतर सुरुवातीला ते दोघेही आनंदात होते. पण काही काळानंतर त्यांच्या नात्यात तणाव आणि वाद वाढू लागले. अखेरीस त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर अमृता सिंग एकटी झाली आणि दोन्ही मुलांची संगोपनाची जबाबदारी तिने एकटीने उचलली.