Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ranjith: मल्याळम दिग्दर्शकला अटक; लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नाप्रकरणी पोलिसांनी घेतले ताब्यात

मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रणजित अडचणीत सापडले आहेत. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामागचे संपूर्ण प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 01, 2026 | 11:31 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • मल्याळम दिग्दर्शक रणजितला अटक
  • दिग्दर्शकावर लैंगिक अत्याचाराचे आरोप
  • १४ दिवसांची न्यायालयीन सुनावली कोठडी
 

एका तरुण अभिनेत्रीने दाखल केलेल्या लैंगिक छळाच्या तक्रारीप्रकरणी, प्रसिद्ध मल्याळम चित्रपट दिग्दर्शक रणजित यांना मंगळवारी रात्री पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही कारवाई गुप्तपणे करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले आहे. एर्नाकुलम सेंट्रल पोलिसांनी थोडुपुझा येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे. कोची न्यायालयाने बुधवारी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याचे समोर आले आहे.

अखेर विजयच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपणार! ‘Jana Nayagan’ ची रिलीज डेट जाहीर, जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

अटकेतील पोलिसांची गुप्तता

पोलिसांच्या सूत्रांनुसार, रणजित एका नियोजित कार्यक्रमासाठी थोडुपुझा येथून जात असताना त्याला वाटेत थांबवण्यात आले. इडुक्कीच्या पोलीस अधीक्षकांच्या निर्देशांनुसार, सार्वजनिक शांतता आणि कोणताही गोंधळ टाळण्यासाठी ही कारवाई अत्यंत गुप्तपणे करण्यात आल्याचे समजले आहे. ताब्यात घेतल्यानंतर, त्याला प्राथमिक कार्यवाहीसाठी प्रथम थोडुपुझा पोलीस ठाण्यात नेण्यात आले, त्यानंतर पुढील चौकशीसाठी त्यांना एर्नाकुलम सेंट्रल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

निर्मिती सुरू असलेल्या चित्रपटाच्या सेटवर घडली घटना

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही घटना निर्मिती सुरू असलेल्या एका चित्रपटाच्या सेटवर घडली आहे. अभिनेत्रीने आरोप केला आहे की, चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शक रणजितने तिच्याशी गैरवर्तन केले आणि तिचा लैंगिक छळ केला. पीडितेने थेट पोलिसांकडे तक्रार दाखल केली नाही; तिने चित्रपटाच्या अंतर्गत तक्रार समितीकडे (ICC) औपचारिक तक्रार दाखल केली आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून, या समितीने हे प्रकरण केरळ पोलिसांकडे सोपवले. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता प्राथमिक तपासादरम्यान संपूर्ण गोपनीयता राखण्यात आली होती आणि केवळ भक्कम पुराव्याच्या आधारावरच कारवाई करण्यात आली आहे.

‘ही 6 मोठी कारणं…’ ज्यामुळे ‘Dhurandhar2’ला पाकिस्तानात मिळतोय जबरदस्त प्रतिसाद; बंदी असूनही पाहतायत चित्रपट

यापूर्वीही दिग्दर्शकावर आरोप

रणजितवर यापूर्वीही लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आहेत. २०२४ मध्ये, एका बंगाली अभिनेत्रीने तक्रार केली होती की, २००९ मध्ये ‘पलेरी माणिक्यम’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्याने तिच्याशी गैरवर्तन केले होते. केरळ उच्च न्यायालयाने रणजितचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला होता. मल्याळम चित्रपटसृष्टीतील लैंगिक छळाच्या प्रकरणांची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती के. हेमा समितीच्या अहवालानंतरही रणजितवरील आरोप समोर आले होते.

Web Title: Malayalam film director ranjith taken into police custody action taken on charges of sexual harassment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 11:31 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • tollywood movie

संबंधित बातम्या

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
1

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
2

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ
3

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
4

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.