(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘लोका’ हा मल्याळम चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन ६ दिवस झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा सुपरहिट चित्रपट ३५ कोटींमध्ये बनवण्यात आला आहे. अवघ्या ६ दिवसांत या चित्रपटाचे स्वतःचे बजेट वसूल केले आहे, आतापर्यंतचे चित्रपटाचे एकूण कलेक्शन ३५.२९ कोटी रुपये झाले आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड आवडत आहे, तर दुसरीकडे हा चित्रपट वादात अडकला आहे. निर्मात्यांनी याबद्दल माफीही मागितली आहे. आता नक्की काय झाले आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
शिल्पा शेट्टी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचली, ‘या’ कारणामुळे घरी साजरा केला नाही उत्सव
‘लोका’ मध्ये बंगळुरूच्या महिलांबद्दल टीका केली
‘लोका’ चित्रपटात एका इन्स्पेक्टरचे पात्र आहे, जो म्हणतो की तो बंगळुरूच्या महिलेशी लग्न करू इच्छित नाही कारण ती चारित्र्यहीन आहे. चित्रपटात, या इन्स्पेक्टरचे महिलांबद्दल वाईट मत आहे, तो नेहमीच त्यांच्याशी नैतिक पोलिसिंग करतो. यामुळे ‘लोका’ चित्रपट सोशल मीडियावर ट्रोल झाला होता. आणि यामुळे अनेक चाहत्यांची मने दुखावली गेली आहे.
निर्मात्यांनी माघितली माफी आणि चित्रपटातून काढून टाकला संवाद
‘लोका’ चित्रपटाच्या निर्मात्यांना अलिकडच्या वादाची माहिती मिळाल्यावर त्यांनी चित्रपटातून हे दृश्य काढून टाकले आहे, तसेच त्यांनी माफीही मागितली आहे. या चित्रपटाचे निर्माते दाक्षिणात्य अभिनेता दुलकर सलमान आहेत. त्यांनी ‘लोका’ या मल्याळम चित्रपटातील बंगळुरूच्या महिलांचा अपमान करणाऱ्या संवादाबद्दल कर्नाटकातील लोकांची माफी मागितली आहे. तसेच, त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसने मंगळवारी एक निवेदन जारी करून दिलगिरी व्यक्त केली आहे आणि चित्रपटातून वादग्रस्त संवाद काढून टाकण्याचे आश्वासन दिले आहे. प्रॉडक्शन हाऊसचे म्हणणे आहे की त्यांचा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता आणि यासाठी ते लोकांची माफी मागण्यास तयार आहेत.
‘लोका’ चित्रपटाची काय आहे कथा?
‘लोका’ चित्रपट हा एक वुमन सुपरहिरोची गोष्ट आहे. चंद्रा नावाची एक मुलगी आहे जिच्याकडे काही सुपरपॉवर आहेत. ती बंगळुरूमध्ये राहायला आली आहे आणि असहाय्य स्त्री-पुरुषांना संकटांपासून वाचवत आहे. ती उडू शकते, तिच्याकडे प्रचंड लढण्याची क्षमता आणि ताकद आहे. चंद्राचा एक भूतकाळ देखील आहे जो प्रेक्षकांना चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. प्रेक्षकांचा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.