(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नेहमीच तिच्या कामामुळे आणि नुकतेच लग्न झाल्यापासून चर्चेत आहे. ती अनेकदा तिचा पती झहीरसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. आता अभिनेत्री आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. हे कारण आहे अभिनेत्रीचे इंटरनेटवरील फोटो तिच्या परवानगीशिवाय काही ब्रँडने वापर आहेत. सिन्हाने कधीही तिचे मत मांडण्यास मागेपुढे पाहिले नाही आणि यावेळी तिने तिचे फोटो वापरल्याबद्दल इन्स्टाग्रामवर अनेक ब्रँड्सवर टीका केली आहे.
दिलजीत दोसांझ नंतर, एमी विर्क पंजाबमधील पीडितांसाठी बनला मसीहा, अभिनेत्याने २०० घरं घेतली दत्तक
अभिनेत्रीने स्वतःच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका कडक शब्दात अनेक ब्रँडना बडेबोल सोनावणे आहे. सोनाक्षीने स्वतः अनेक ब्रँड प्रोमोशन सोशल मीडियावर केले आहे. परंतु कोणत्याही ब्रँडने तिच्या परवानगीशिवाय तिचे फोटो वापरल्याबद्दल तिने राग व्यक्त केला आहे. अभिनेत्रीने लिहिले की, ‘माझे फोटो कोणत्याही परवानगीशिवाय आणि विनंतीशिवाय वापर जात आहे.’
अभिनेत्री पुढे लिहिले की, ‘कोणत्याही कलाकारांनी ब्रँडचे कपडे घालताना किंवा दागिने घालताना त्यांना श्रेय देणे आणि ते पोस्ट करणे हे सामान्य आहे. परंतु कोणत्याही ब्रँड वेबसाइटवर ते फोटो कोणत्याही परवानगीशिवाय दिसणे हे बरोबर नाही.’ ब्रँडना आदराचे आवाहन करून, अभिनेत्री सोनाक्षीने त्यांना तिचे फोटो सार्वजनिकरित्या ती काही बोलण्यापूर्वी काढून टाकण्याचा इशारा दिला आहे.
शिल्पा शेट्टी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचली, ‘या’ कारणामुळे घरी साजरा केला नाही उत्सव
स्पष्टवक्तव्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाक्षी अनेकदा तिचा पती झहीर इक्बालसोबतचे गोड आणि आनंदी क्षण शेअर करताना दिसत असते. अलिकडेच, अभिनेत्रीने एक मजेदार व्हिडिओ अपलोड केला ज्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. क्लिपमध्ये, सोनाक्षी तिच्या हास्यावर नियंत्रण ठेवण्याचा खूप प्रयत्न करताना दिसत आहे, परंतु झहीर तिला हसवत राहतो आणि ती अखेर हसू लागते. चाहत्यांना या दोघांची जोडी खूप आवडते आणि ते त्यांना भरभरून कंमेंट करून प्रतिसाद देखील देतात.