
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
Masti 4 Teser: ‘मस्ती 4’ या बहुप्रतिक्षित विनोदी चित्रपटाचा टीझर मंगळवारी प्रदर्शित करण्यात आला असून, चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यावेळी हास्य, धमाल आणि मैत्रीचा डोस आधीच्या तिन्ही भागांपेक्षा चार पट अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. ‘मस्ती 4’ हा धमाल विनोदी चित्रपट येत्या 21 नोव्हेंबर 2025 रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या भागातही विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख आणि आफताब शिवदासानी हे त्रिकूट परत एकत्र येणार असून, या वेळी चौथा ‘सरप्राईज’ कॅरेक्टर कोण असणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.
मस्ती फ्रॅंचायझीची सुरूवात 2004 मध्ये झाली होती. या चित्रपटात अजय देवगण, विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख, आफताब शिवदासानी, लारा दत्ता, अमृता राव, तारा शर्मा आणि जेनेलिया यांसारख्या कलाकारांचा समावेश होता. या यशानंतर ‘ग्रँड मस्ती’ आणि ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ हे सिक्वेल्स आले, ज्यांनी देखील प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. मस्ती सिनेमाला बॉक्स ऑफिसवर भरभरून प्रतिसाद मिळाला होता. आता या तिघांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मस्ती फ्रॅंचायझीच्या चौथ्या भागाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
मस्ती ४’ सिनेमाचा धमाकेदार टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून यामध्ये पुन्हा एकदा रितेश, विवेक आणि आफताब यांचं त्रिकुट पाहायला मिळणार आहे. यामध्ये श्रेया शर्मा, रुही सिंग आणि एलनाझ नोरोझी या अभिनेत्रींची वर्णी लागली आहे.मस्ती 4’ ची निर्मिती झी स्टुडिओज आणि वेवबँड प्रोडक्शन यांनी मारुती इंटरनॅशनल आणि बालाजी टेलीफिल्म्स यांच्या सहयोगाने केली आहे.