
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
दक्षिण भारतीय इंडस्ट्रीमधून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कन्नड अभिनेता मयूर पटेलने दारू पिऊन फॉर्च्युनर चालवताना चार गाडयांना टक्कर दिल्याचे समोर आले आहे. सगळे नियम मोडून, मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याने अभिनेत्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु हा अपघात थोडक्यात वाचला आहे. या अपघातात चार वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने, कोणीही जखमी झालेलं नाही. या घटनेनंतर, अभिनेता मयूर पटेलविरुद्ध बेंगळुरूमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
अभिषेक आणि प्रणितच्या मैत्रीत फूट? दोघांनी एकमेकांना केले अनफॉलो, ‘Bigg Boss19’ ठरलं कारण
अभिनेत्याविरुद्ध एफआयआर दाखल
मयूरविरुद्ध तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीचे नाव श्रीनिवास आहे. पोलिसांनी अभिनेत्याची कार जप्त केली आहे. वृत्तानुसार, बेंगळुरूमधील सिलिकॉन सिटीमधील ओल्ड एअरपोर्ट रोडवरील कमांडो हॉस्पिटल सिग्नलजवळ हा अपघात झाला आहे. मयूर दारू पिऊन वेगाने त्याची फॉर्च्युनर चालवत होता आणि या घटनेदरम्यान तो सिग्नलच्या मागे उभ्या असलेल्या कारला धडकला. आणि यानंतर त्याच्या गाडीची धडक चार गाडयांना बसली.
पोलिसांनी अभिनेत्याचे वाहन केले जप्त
TV9 कन्नडच्या वृत्तानुसार, हलासुरु वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अभिनेता मयूरला ताब्यात घेतले आहे आणि त्याची ड्रिंक अँड ड्राईव्ह टेस्ट केली. तपासादरम्यान, अभिनेता दारूच्या नशेत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी जप्त केलेल्या कारचा विमा देखील कालबाह्य झाला होता. पोलिसांनी सध्या अभिनेत्याची फॉर्च्युनर कार जप्त केली आहे आणि हलासुरु वाहतूक स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहशत अन् भीतीने भरलेले चेहरे, आणखी एक थरारक कथेची झलक; The Kerala Story 2 चे मोशन पोस्टर रिलीज
तक्रारदाराच्या वेदना बाहेर पडल्या
वृत्तानुसार, मयूर पटेलविरुद्ध एफआयआर दाखल करणाऱ्या श्रीनिवासची गाडी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. पोलिस स्टेशनबाहेर रडत श्रीनिवास म्हणाले, “मी माझ्या पत्नीचे दागिने गहाण ठेवून ही नवीन गाडी फक्त एका आठवड्यापूर्वी खरेदी केली होती. मी ही गाडी कंपनीला भाड्याने देऊन घर चालवत होतो. पहिला हप्ता ५ फेब्रुवारी रोजी भरायचा आहे. जर गाडी बिघडली तर मी कर्ज कसे फेडू?” असे म्हणून त्यांनी आपल्या अडचणी सांगितल्या आहेत. आता पुढे अभिनेत्यावत पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.