(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील फार कमी दिग्दर्शक आहेत, ज्यांचे फॅन फॉलोइंग बॉलीवूडमध्येही प्रचंड आहे. या यादीत संदीप रेड्डी वंगा यांचाही समावेश आहे. कबीर सिंग आणि ॲनिमल सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा संदीप आता साऊथचा सुपरस्टार प्रभाससोबत ‘स्पिरिट’ हा आगामी चित्रपट घेऊन येत आहे, ज्यामध्ये बॉलीवूड स्टार्सचीही झलक पाहायला मिळणार आहे. संदीप रेड्डी वंगा यांनी २०२१ मध्येच स्पिरिटची घोषणा केली होती. प्रभास स्टारर चित्रपट एक कॉप ॲक्शन थ्रिलर असणार आहे. या चित्रपटात नायकाचे नाव आधीच समोर आले आहे, मात्र आता प्रभासच्या हिरोईनचा चेहराही समोर आला आहे.
मृणाल ठाकूरचा या चित्रपटामध्ये समावेश
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, संदीप रेड्डी वंगा यांनी स्पिरिटसाठी नायिकेची निवड केली आहे. कॉप थ्रिलरमध्ये प्रभाससोबत दिसणारी नायिका 32 वर्षांची मृणाल ठाकूर आहे. यात मृणाल मुख्य भूमिकेत असल्याचे सांगितले जात आहे. अभिनेत्रीशिवाय या चित्रपटात रियल लाईफ कपल करीना कपूर खान आणि सैफ अली खान देखील दिसणार आहेत. हे चौघेही या चित्रपटामध्ये नव्या अंदाजात आणि नव्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहेत.
‘निर्धार’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण, चित्रपट केव्हा रिलीज होणार ?
करीना-सैफही एकत्र दिसणार आहेत
करीना आणि सैफ पहिल्यांदाच एकत्र साऊथ सिनेमामध्ये काम करताना दिसणार आहेत. तसेच दोघेही पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारणार आहेत. रिपोर्टनुसार, संदीप रेड्डी वंगा यांच्या चित्रपटातील त्याची नकारात्मक भूमिका खूप दमदार असणार आहे. संदीप हा चित्रपट इतर कथांपेक्षा वेगळा बनवणार आहे. सध्या तरी प्रभासनंतर बाकीच्या स्टारकास्टची अधिकृत घोषणा निर्मात्यांनी केलेली नाही. परंतु या चित्रपटामधील स्टारकास्ट पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.
कधी होणार चित्रपट प्रदर्शित
संदीप रेड्डी वंगा ‘स्पिरिट’ चित्रपटासाठी जोरदार तयारी करत आहेत. या वर्षी त्यांनी या चित्रपटावर 300 कोटी रुपये खर्च करत असल्याचा खुलासा केला होता. अशा परिस्थितीत ते चित्रपट जबरदस्त बनवण्यात कोणतीही कसर सोडत नाही. या चित्रपटात ते पोलिसाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु २०२६ मध्ये हा चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखल होण्याची जास्त शक्यता आहे.