दोन घटस्फोटानंतर आमिर खान पुन्हा तिसऱ्यांदा पडला प्रेमात ? कुटुंबासोबतही दिली करुन ओळख; कोण आहे ती?
सितारे जमीन पर हा बॉलीवूडच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात आमिर खान, जेनेलिया देशमुख आणि दर्शील सफारी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आमिरने नुकतेच या प्रोजेक्टचे अपडेट दिले आणि सांगितले की तो २०२५ च्या मध्यात रिलीज होऊ शकतो. आज मिळालेल्या माहितीनुसार, सितारे जमीन परचे शूटिंग पूर्ण झाले असून चित्रपटाच्या पोस्ट-प्रॉडक्शनचे काम सुरु झाले आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट २०२५ मध्ये रिलीज होणार असून या चित्रपटाची डेट अद्यापही समोर आलेली नाही.
पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू झाले
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी चित्रपट ‘सीतारे जमीन पर’ ची शूटिंग 15 डिसेंबर 2024 रोजी पूर्ण झाली आहे. आरएस प्रसन्ना दिग्दर्शित या चित्रपटाच्या पॅच शूटसाठी आमिर खान फिल्मसिटीच्या सेटवर उपस्थित होता. दुपारी दोन वाजता सुरू झालेले शूटिंग रात्रीपर्यंत सुरू होते. मात्र, सितारे जमीन परचे शूटिंग पूर्ण झाले असून आता अंतिम टप्प्यात आले आहे. आमिर आणि प्रसन्ना आता पोस्ट-प्रॉडक्शनकडे लक्ष देणार आहेत, ज्यात संपादन, व्हिज्युअल इफेक्ट आणि ध्वनी डिझाइन यांचा समावेश असणार आहे.
कधी होईल चित्रपट प्रदर्शित
मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्माते 2025 च्या उन्हाळ्यात ‘सितारे जमीन पर’ रिलीज करू शकतात आणि फेब्रुवारीमध्ये चित्रपटाचे सामूहिक स्क्रीनिंग आयोजित केले जाऊ शकते. प्रेक्षकांच्या प्रतिसादावर आधारित त्याच्या प्रोजेक्टला ‘फाईन-ट्यूनिंग’ करण्यावर आमिर खान यांचा विश्वास आहे, त्यामुळे ते हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये दाखवता यावा यासाठी टीम अंतिम संपादनांवर काम करत आहे.
काय असेल चित्रपटाची कथा
याआधी अभिनेता आमिर खानने सौदी अरेबियातील रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. तिथे एका मुलाखतीदरम्यान आमिरने सितारे जमीन परबद्दल काही रंजक माहिती शेअर केली होती. त्यांनी सांगितले की, ‘हा त्याचा 2007 मध्ये आलेल्या ‘तारे जमीन पर’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात नवीन पात्रे आणि नवीन कथा असणार असल्याचे अभिनेत्याने सांगितले.’ हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. तसेच या चित्रपटाची कथा काय असेल हे पाहण्यासाठी ते आतुर आहेत.