(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
काही वर्षांपूर्वी अशी बातमी आली होती की श्रद्धा कपूर ‘नागिन’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. आता या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट आली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. अशी बातमी समोर आली आहे कारण अलीकडेच या चित्रपटाच्या निर्मात्याने एक महत्त्वाची अपडेट शेअर केली आहे. तसेच या चित्रपटाची कथा आणि स्टारकास्ट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
निखिल द्विवेदी यांनी फोटो शेअर केला
मकर संक्रांतीच्या निमित्ताने निखिल द्विवेदीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये चित्रपटाच्या पटकथेची झलक दिसते आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये ‘नागिन अॅन एपिक टेल ऑफ लव्ह अँड सॅक्रिफाइस’ असे लिहिले आहे. खाली Created and Developed by Saffron Magic Works असे लिहिले आहे. लिपीभोवती झेंडूची फुले देखील दिसत आहेत. या फोटोमधून असे दिसत आहे की या चित्रपटाची शूटिंग सुरु होणार आहे. त्याचीच माहिती निखिल द्विवेदी चाहत्यांसह शेअर केली आहे.
शूटिंग कधी सुरू होणार?
निखिल द्विवेदी यांनी या फोटोला कॅप्शन दिले आहे, “मकर संक्रांती आणि शेवटी….” या कॅप्शनवरून स्पष्टपणे दिसून येते की चित्रपटाचे काम आता सुरू होणार आहे. गेल्या वर्षी एका मुलाखतीत निखिल द्विवेदी म्हणाले होते की श्रद्धा कपूर या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यासाठी खूप उत्सुक आहे. त्यांनी असेही सांगितले होते की चित्रपटाचे चित्रीकरण २०२५ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. आता हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. परंतु याबाबत अभिनेत्री श्रद्धा कपूरने कोणतीही माहिती दिली नाही आहे.
श्रद्धा ‘स्त्री २’ मध्ये दिसली होती.
श्रद्धा कपूर शेवटची हॉरर कॉमेडी चित्रपट ‘स्त्री २’ मध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ₹५९७.९९ कोटींची कमाई केली. हा चित्रपट २०२४ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट ठरला होता. तसेच प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देखील दिला आहे. या चित्रपटाच्या यशानंतर आता अभिनेत्रीचे आगामी चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तसेच तिला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी ते प्रतीक्षा करत आहेत.