Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“…डोंगरावर अडकून पडले होते”, Swayambhu च्या चित्रीकरणाचा थरारक अनुभव; दिग्दर्शकाने सांगितला ‘तो’ किस्सा

स्वयंभू’चा टीझर प्रदर्शित झाल्यापासून ही फिल्म निखिल सिद्धार्थच्या सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक ठरली आहे, विशेषतः ‘कार्तिकेय 2’च्या यशानंतर. भव्यता, मोठा स्केल आणि दमदार कथानकाची झलकची सध्या चर्चा सुरु आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 09, 2026 | 03:33 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • स्वयंभूसाठी निवडली खरी जंगलं,
  • ‘पुष्पा’च्या लोकेशनवर झाली ‘स्वयंभू’ची शूटिंग,
  • दिग्दर्शक भरत कृष्णमाचारी यांनी केला खुलासा
Swayambhu Director Recollects : ‘स्वयंभू’चा टीझर प्रदर्शित झाल्यापासून ही फिल्म निखिल सिद्धार्थच्या सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक ठरली आहे, विशेषतः ‘कार्तिकेय 2’च्या यशानंतर. भव्यता, मोठा स्केल आणि दमदार कथानकाची झलक दाखवणाऱ्या या टीझरचं त्याच्या सिनेमॅटिक दृष्टिकोनासाठी भरभरून कौतुक करण्यात आलं. चित्रपटाबद्दल वाढत्या उत्सुकतेदरम्यान त्यातील पहिलं गाणं ‘रा रा धीवरा’देखील मोठं हिट ठरलं आहे.

Pravin Tarde : नसरापूर घटनेवर पुन्हा पेटला अभिनेता! “आता स्वतः स्वामींनाच…”, ‘या’ सिक्वेलमध्ये काढणार 11 सिनेमे

कठीण भागांमध्ये आणि दुर्गम जंगलांत चित्रीकरण

हा एक मेगा प्रोजेक्ट असल्याने चित्रपटाचं चित्रीकरण कठीण भागांमध्ये आणि दुर्गम जंगलांतील वास्तविक लोकेशन्सवर करण्यात आलं. याबाबत बोलताना दिग्दर्शक भरत कृष्णमाचारी म्हणाले, “लाइव्ह-अॅक्शन भागांसाठी आम्ही आंध्र प्रदेशातील राजामुंद्रीजवळच्या मारेडुमिल्ली जंगलांची निवड केली. हाच तो परिसर आहे जिथे ‘पुष्पा’मधील जंगलातील सीक्वेन्स शूट करण्यात आले होते. मात्र आम्ही खास करून अशा अनस्पर्शित जागा निवडल्या, जिथे यापूर्वी कधीच शूटिंग झालं नव्हतं.”

डोंगरावर अडकून पडले होते

ते पुढे म्हणाले, “त्या ठिकाणी पोहोचणं स्वतःमध्ये एक मोठं साहस होतं. डोंगराच्या शिखरावर पोहोचण्यासाठी आम्हाला सुमारे 2 ते 2.5 तास जीपने प्रवास करावा लागत होता. अशाच एका शेड्यूलदरम्यान अचानक पाऊस सुरू झाला आणि आमच्या टीममधील काही सदस्य आवश्यक सामानाशिवाय जवळपास एक-दोन दिवस डोंगरावर अडकून पडले होते.” ते म्हणाले, “विशेष म्हणजे, त्या सुंदर आणि अनस्पर्शित लोकेशनवर शूटिंग करण्याची परवानगी मिळवणाऱ्या सुरुवातीच्या टीम्सपैकी आमची टीम एक होती.”

सुवर्णयुगाच्या पार्श्वभूमीवर आधारित कथा

‘स्वयंभू’चा टीझर भारताच्या गौरवशाली सुवर्णयुगाच्या पार्श्वभूमीवर आधारित कथा दाखवतो, जी वारसा, शौर्य आणि सांस्कृतिक महत्त्वाने परिपूर्ण आहे. कथानकाच्या केंद्रस्थानी ‘सेंगोल’चं प्रभावी प्रतीक दिसून येतं, जे परंपरा आणि सन्मानाची कथा सूचित करतं. निखिल सिद्धार्थ या चित्रपटात अत्यंत प्रभावी आणि दमदार अवतारात दिसत आहेत, तर टीझर भव्य दृश्यं, गडद नाट्य आणि जबरदस्त अॅक्शनने भरलेला आहे.

तब्बल 170 दिवस चाललेल्या शूटिंग

‘स्वयंभू’साठी इंडस्ट्रीतील अनेक मोठे टेक्निशियन आणि क्रिएटिव्ह टॅलेंट एकत्र आले आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन भरत कृष्णमाचारी यांनी केलं आहे. चित्रपटाला संगीत रवि बसरूर यांचं असून ते ‘केजीएफ’ आणि ‘सालार’साठी प्रसिद्ध आहेत. अप्रतिम दृश्यांसाठी छायाचित्रण केके सेंथिल कुमार यांनी केलं आहे, ज्यांनी ‘बाहुबली’ आणि ‘आरआरआर’सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर एडिटिंग तम्मिराजू यांनी केली असून ते ‘बाहुबली’शी संबंधित राहिले आहेत. तब्बल 170 दिवस चाललेल्या शूटिंगमुळे हा प्रोजेक्ट अलीकडच्या काळातील सर्वाधिक महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक मानला जात आहे.

‘स्वयंभू’ची निर्मिती भुवन आणि श्रीकर यांनी पिक्सल स्टुडिओजच्या बॅनरखाली केली आहे. भारताच्या समृद्ध इतिहासाला आणि शाश्वत गौरवाला समर्पित भव्य प्रस्तुती म्हणून तयार करण्यात आलेला हा चित्रपट समर 2026 मध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.

“तू आनंदी राहणं डिझर्व्ह…”, पती असावा तर असा… बिगबॉस फेम ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी दिलं मोठं गिफ्ट

Web Title: Nikhil siddhartha swayambhu movie shooting challenges teaser release date marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.