Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shekhar Suman : “तुम्हीही बिहारी आहात!” मराठी भाषा वादावर Nitin Gadkari यांची स्पष्ट भूमिका

Shekhar Suman यांनी चौदा वर्षांनंतर ‘Shekhar Tonight’ या नव्या टॉक शोद्वारे पुनरागमन केले असून, पहिल्याच भागात Nitin Gadkari यांनी हजेरी लावत विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 16, 2026 | 07:51 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • विविधतेत एकता ही भारताची ताकद असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
  • जात, धर्म, भाषा किंवा श्रद्धेच्या आधारावर भेदभाव न करण्याची आपली भूमिका त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.
  • शो दर शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता यूट्यूबवर प्रदर्शित होत आहे.
चौदा वर्षांनंतर Shekhar Suman यांनी ‘Shekhar Tonight’ या नव्या लेट-नाईट टॉक शोद्वारे पुनरागमन केले आहे. यूट्यूबवर सुरू झालेल्या या शोच्या पहिल्याच भागात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री Nitin Gadkari यांनी हजेरी लावत भाषा, राजकारण, संस्कृती आणि सामाजिक जबाबदारी यांसारख्या विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल बोलताना गडकरी यांनी मराठी भाषेचा अभिमान व्यक्त केला. “मराठी भाषा, साहित्य, नाटकं, गाणी आणि संस्कृतीचा मला अभिमान आहे. महाराष्ट्राबाहेर जास्त वेळ घालवल्यानंतर मला मराठी असण्याचं खरं महत्त्व अधिक जाणवलं,” असे ते म्हणाले. विविधतेत एकता ही भारताची ताकद असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

फ्रान्सच्या मातीत येणार मराठमोळं वादळ! मराठी सिनेसृष्टीचे ‘हे’ सितारे झळकणार Cannes Film Festival 2026 सोहळ्यात

संवादादरम्यान शेखर सुमन यांनी अलीकडील मराठी भाषा वादाचा मुद्दा उपस्थित केला. “मराठी न येणाऱ्यांना रिक्षा किंवा स्कूटर चालवण्यास मनाई होणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे आमच्यासारख्या बिहारी लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं,” असे ते मिश्कील शैलीत म्हणाले. त्यावर हसत उत्तर देताना गडकरी म्हणाले, “तुम्हीही बिहारी आहात!” तसेच त्यांनी बिहारमध्ये केंद्र सरकारने उभारलेल्या पायाभूत सुविधांचा उल्लेख करत, “जर आम्ही बिहाऱ्यांच्या विरोधात असतो, तर बिहारमध्ये इतकी विकासकामं केली नसती,” असेही स्पष्ट केले.

भाषेबाबतची भूमिका स्पष्ट करताना गडकरी म्हणाले की, प्रत्येकाने स्थानिक भाषा आणि संस्कृतीचा आदर केला पाहिजे. “मला रिक्षा चालवावी लागली, तर मीसुद्धा मराठी शिकेन. प्रत्येक भाषेला तिचा अभिमान असावा, पण तो अतिरेकी किंवा हटवादी नसावा,” असे ते म्हणाले. राजकारण आणि सामाजिक जबाबदारी यावर भाष्य करताना गडकरी यांनी जनतेलाच बदलाची खरी ताकद असल्याचे सांगितले. “लोकांनी चुकीच्या राजकारणाला नकार दिला, तर संपूर्ण व्यवस्था बदलू शकते,” असे ते म्हणाले. तसेच जात, धर्म, भाषा किंवा श्रद्धेच्या आधारावर भेदभाव न करण्याची आपली भूमिका त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.

Mouni Roy Divorce : “एक तर लग्न कर, नाही तर Break Up” मौनीचा हट्ट! पण सुरजची इच्छा नव्हती? केला खुलासा

Adhyayan Suman निर्मित आणि Dharmesh Sangani प्रस्तुत ‘Shekhar Tonight’ हा शो दर शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता यूट्यूबवर प्रदर्शित होत आहे.

Web Title: Nitin gadkaris clear stance on the marathi language controversy on shekhar suman show

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 07:51 PM

Topics:  

  • Nitin Gadkari
  • Shekhar Suman

संबंधित बातम्या

‘शुद्ध पेट्रोल तुझ्या बापाच्या घरून येणार का?’; इथेनॉलच्या मुद्द्यावर भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
1

‘शुद्ध पेट्रोल तुझ्या बापाच्या घरून येणार का?’; इथेनॉलच्या मुद्द्यावर भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

E20 Petrol: ई२० पेट्रोलमध्ये क्लोराईड आणि पाणी? सोशल मीडियावरील दाव्यांचे तेल कंपन्यांनी स्पष्ट केले सत्य; पाहा केला खुलासा
2

E20 Petrol: ई२० पेट्रोलमध्ये क्लोराईड आणि पाणी? सोशल मीडियावरील दाव्यांचे तेल कंपन्यांनी स्पष्ट केले सत्य; पाहा केला खुलासा

मोदी-शहा भेटीमागचं खरं कारण काय? सुनील तटकरेंचा मोठा खुलासा, राजकीय भेटींमुळे तर्कवितर्कांना उधाण
3

मोदी-शहा भेटीमागचं खरं कारण काय? सुनील तटकरेंचा मोठा खुलासा, राजकीय भेटींमुळे तर्कवितर्कांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.