Cannes Film Festival 2026 हा जागतिक स्तरावरील चित्रपट महोत्सव सध्या चर्चेचा कारण ठरत आहे. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी या चित्रपट सोहळ्यात झळकणार आहेत. यामध्ये एका दिग्गज अभिनेत्याचे नाव देखील शामिल आहे. एकंदरीत, अगदी काहीच दिवसांपूर्वी मराठी सिनेस्टार पुष्कर जोगनेही Cannes Film Festival च्या Red Carpet वर हजेरी लावली होती.
पुष्कर जोगनंतर 'हे' मराठी सितारे झळकणार Cannes च्या रेड कार्पेटवर. (फोटो सौजन्य - Social Media)

यंदाचा Cannes Film Festival 2026 चा Red Carpet गाजवण्यासाठी महाराष्ट्राची सिनेमंडळी फ्रांसकडे रवाना झाले आहेत. दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी त्यांच्या पत्नी दिग्गज अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्यसह Cannes च्या दिशेने प्रवास सुरु केला आहे.

लवकरच महाराष्ट्राची ही दिग्गज जोडी Cannes Film Festival 2026 च्या Red Carpet वर झळकणार आहेत. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळीही या सोहळ्याला उपस्थिती लावण्यासाठी निघाली आहे.

या कार्यक्रमाचे विशेष लक्ष घेणारी Kokan Hearted Girl म्हणजे अंकिता वालावलकर ठरली आहे. Social Media Influencer Ankita ने सोशल मीडियावर याबाबत पोस्टही शेअर केली आहे.

प्रसिद्ध मराठी Podcaster जयंती वाघधरेही Cannes Film Festival 2026 मध्ये झळकणार आहे. तसेच अभिजात मराठी OTT चे संस्थापक केदार जोशी यांचीदेखील Red Carpet वर खास उपस्थिती पाहायला मिळणार आहे.

एकंदरीत, अभिजात मराठी ओटीटीसोबत Cannesची सफर आपल्याला पाहायला मिळणार असून Cannes साठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, प्राजक्ता माळी, अंकिता वालावलकर, जयंती वाघधरे आणि केदार जोशी रवाना झाले आहेत.एकंदरीत, अभिजात मराठी ओटीटीसोबत Cannesची सफर आपल्याला पाहायला मिळणार असून Cannes साठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, प्राजक्ता माळी, अंकिता वालावलकर, जयंती वाघधरे आणि केदार जोशी रवाना झाले आहेत.






