Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑस्कर 2026 वादात! Dharmendra यांना ‘इन मेमोरियम’मध्ये मिळाले नाही स्थान; चाहत्यांची नाराजी

ऑस्कर २०२६ ने यावर्षी भारतीय चाहत्यांना निराश केले आहे. धर्मेंद्र यांना ऑस्कर २०२६ च्या इन मेमोरियम विभागात सामील करण्यात आले नाही. त्यांना श्रद्धांजली देण्यात आली नाही, ज्यामुळे भारतीय चाहते संतापले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 16, 2026 | 11:45 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • धर्मेंद्र यांच्याकडे ‘इन मेमोरियम’ने केले दुर्लक्षित
  • धर्मेंद्र यांना मिळाले नाही ‘इन मेमोरियम’मध्ये स्थान
  • धर्मेंद्र यांच्या चाहत्यांचा झाला संताप
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी त्यांच्या अभिनयाने आणि आकर्षित शैलीने मन जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही. धर्मेंद्र हे बॉलीवूडचे ही-मॅन म्हणून ओळखले जात होते. परंतु, गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर रोजी या अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतला. धर्मेंद्र यांचे निधन त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, चित्रपट उद्योगातील योगदान असूनही, धर्मेंद्र यांना २०२६ च्या ऑस्करमध्ये दुर्लक्षित करण्यात आले. त्यांचा “इन मेमोरियम” श्रेणीत समावेश करण्यात आले नाही. अनेक हॉलिवूड स्टार्सना “इन मेमोरियम” ने सन्मानित करण्यात आले असले तरी, चित्रपटांमधील योगदान असूनही या ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्याला दुर्लक्षित करण्यात आले. आणि याचमुळे चाहत्यांचा संताप झाल्याचे समोर आले आहे.

Akshay Kumar ला ‘धुरंधर’ मध्ये काम करण्याची मिळाली होती संधी? अभिनेत्याने अखेर केला खुलासा

धर्मेंद्र यांना बाफ्टा पुरस्कारांमध्ये देखील सन्मानित करण्यात आले आणि त्यांना श्रद्धांजली देण्यात आली आहे. परंतु, २०२६ च्या अकादमी पुरस्कारांमध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला नाही. यामुळे धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. धर्मेंद्र व्यतिरिक्त, ऑस्कर २०२६ मध्ये अनेक हॉलिवूड स्टार्सना सन्मानित करण्यात आले, ज्यात चित्रपट निर्माते रॉबर्ट रेडफोर्ड, डायन कीटन, कॅथरीन, रॉब रेनर, रॉबर्ट डुव्हल, जेक हॅकमन आणि व्हॅल किल्मर यांचा समावेश आहे. २०२६ च्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये या कलाकारांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाची देखील दखल घेण्यात आली.

या भारतीय कलाकारांना ऑस्करमध्ये सन्मानित केले

२०२६ च्या ऑस्करमध्ये धर्मेंद्र यांना सन्मानित करण्यात आले नव्हते. परंतु, त्यांच्यापूर्वी अनेक भारतीय स्टार्सना सन्मानित करण्यात आले आहे. या यादीत नितीन चंद्रकांत देसाई, इरफान खान, भानू अथैया, श्रीदेवी आणि शशी कपूर यांचा समावेश आहे. त्यामुळे, लोकांना आशा होती की धर्मेंद्र यांनाही २०२६ च्या ऑस्करमध्ये सन्मानित केले जाईल. परंतु असे काहीही झाले आणि आणि आता चाहत्यांचा संताप झाला आहे.

सुनील ग्रोव्हरने उडवले होश! कादर खान यांची मिमिक्री पाहून चाहत्यांसह सेलिब्रिटीही थक्क; कॉमेडियनचं होतंय कौतुक

धर्मेंद्र यांनी या चित्रपटाद्वारे केले पदार्पण

धर्मेंद्र यांनी ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत “फूल और पत्थर,” “शोले,” “सीता और गीता,” आणि “अनुपमा” सारख्या चित्रपटांसह अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दिग्गज अभिनेते जरी आता आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी आणि चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहणार आहे.

Web Title: Oscar 2026 dharmendra excluded from in memoriam at academy awards not get tribute fans angry over it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Bollywood
  • dharmendra
  • entertainment

संबंधित बातम्या

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!
1

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?
2

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती
3

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी
4

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.