
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अभिनेत्री अमृता खानविलकरने पडद्यावर कायम काहीतरी नवीन भूमिका करून स्वतःच्या मर्यादा ओलांडून त्या पलिकडे जाऊन प्रेक्षकांना मोहित केलं आहे. सध्या अमृताच्या तस्करी वेब सीरिजच्या जोरदार चर्चा सुरू आहेत तिच्या अॅक्शन सीन पासून ते कस्टम ऑफिसर मिताली कामत म्हणून साकारलेली तिची भूमिका लक्षवेधी ठरताना दिसतेय. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या तिच्या पहिल्यावहिल्या अॅक्शन वेब सीरिज “तस्करी” च्या शूटिंगदरम्यानचा एक अविस्मरणीय अनुभव तिने नुकताच शेअर केला आहे.
तस्करी मध्ये अमृताने अनेक अॅक्शन सीन केले असून तिची ही पहिली वेब सीरिज आहे ज्यात ती पहिल्यांदा दमदार अॅक्शन मोड मध्ये बघायला मिळतेय. शूट दरम्यानचा हा खास किस्सा अमृताने शेयर केला आहे. तस्करी मधल्या पहिल्याच अॅक्शन सीनदरम्यान तिला दुखापत झाली होती तरीही तिने शूटिंग सुरूच ठेवल त्या क्षणी नकळत तिने एका स्टंटमनच्या चेहऱ्यावर इतक्या जोरात मार दिला की तिच मनगट सुजल आणि तब्बल महिनाभर तिच्या मनगटावर ही दुखापत राहिली.
अमृता सांगते “माझा पहिला अॅक्शन सीन शूट करताना मला दुखापत झाली होती पण तरीही मी शूटिंग सुरू ठेवले. चुकून एका स्टंटमनच्या चेहऱ्यावर माझा हात लागला आणि त्यामुळे माझा मनगट महिनाभर सुजलेला होता. तरीसुद्धा हा अनुभव माझ्यासाठी खूपच समाधानकारक होता कारण यातून मला अॅक्शन सीनचे डूज आणि डोन्ट्स नीट समजले. अॅक्शन सीनदरम्यान आपल्याकडून सहकलाकारांना नकळत मार बसायचा असं सुद्धा कधीतरी वाटून जायचं पण हे सीन इतके वास्तवदर्शी असायचे की ते सेटवर हसण्याचा विषय बनले होते.
मराठी मालिकेतून हिंदी वेबविश्वात अक्षया नाईकची यशस्वी झेप, तस्करी भूमिका ठरतेय चर्चेचा विषय
या एका सीन मुळे खरं तर सेटवर अनेक जण माझ्यासोबत अॅक्शन सीन करायला घाबरायला लागले कारण नकळत त्यांना मार बसणार का ही भीती असायची आणि इम्रान हाश्मी तर सगळ्यांसमोर गंमतीने सांगायचा की तो माझ्यासोबत अॅक्शन सीन करणारच नाही” तस्करी मध्ये पहिल्यांदा अॅक्शन सीन शूट करताना काय घडलं यातून मी अनेक गोष्टी शिकले हा एक नवा अनुभव असला तरी अनेक गोष्टी शिकवून जाणारा आणि लक्षात राहणारा ठरला.
कस्टम ऑफिसर असलेल्या मिताली कामतची भूमिका अमृताने दमदार तर साकारली पण तिचा हा अॅक्शन पॅक परफॉर्मन्स कौतुकास्पद आहे. लवकरच अमृता अजून एका नव्या कोऱ्या भूमिकेत दिसणार असून आगामी स्पेस जेन चांद्रयान मध्ये झळकणार आहे.