(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा तिच्या आयुष्यात एका नवीन अध्यायात लवकरच सुरु करणार आहे. अभिनेत्रीचा पती आणि नेता राघव चढ्ढा आणि अभिनेत्री लवकरच आई- बाबा होणार आहेत. परिणीती चोप्राच्या प्रसूतीबाबतची ताजी बातमी आता समोर आली आहे की तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चढ्ढा कुटुंबाकडून कधीही आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. ती सध्या तिच्या पतीसोबत दिल्लीत राहत आहे. परंतु, कुटुंबाकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.
9 ते 5 नोकरी करणाऱ्यांबाबत काजोलने केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, आता स्पष्टीकरण देत म्हणाली,….
पिंकव्हिलामधील वृत्तानुसार, परिणीती चोप्रा रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. तिची प्रसूती लवकरच अपेक्षित आहे. ती तिच्या पहिल्या मुलाचे स्वागत करण्यास सज्ज आहे. परिणीती चोप्राचे अनेक चाहतेही आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच आता सगळ्यांचे लक्ष या गुड न्यूजकडे लागले आहे.
परिणीती चोप्रा रुग्णालयात दाखल
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्यासाठी ही दिवाळी खास असणार आहे. ही दिवाळी त्यांच्या आयुष्यात नवीन आनंद घेऊन येत आहे. परिणीती सध्या तिच्या सासरच्या घरी आहे, राघवही तिच्यासोबत आहे. अभिनेत्रीने तिच्या प्रसूतीसाठी मुंबईऐवजी दिल्लीची निवड केली, ती ऑक्टोबरमध्ये दिल्लीला गेली होती. आणि आता तिला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कपलने दिली आनंदाची बातमी
२५ ऑगस्ट २०२५ रोजी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा या दोघांनी अभिनेत्याच्या प्रेग्नंसीची अधिकृत घोषणा केली. त्यांनी त्यांच्या आई बाबा होण्याबद्दल पुष्टी करणारी एक गोड पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये लिहिले होते, “१+१=३.” हे पाहून चाहत्यांनी त्यांना अभिनंदन केले आणि ते देखील खुश झाले.
घटस्फोटाच्या अफवांदरम्यान हंसिका मोटवानीने बदललं आडनाव, अभिनेत्रीने ‘का’ उचललं हे पाऊल?
राघव चढ्ढा यांनी दिला इशारा
या वर्षी, राघव चढ्ढा यांनी कपिल शर्माच्या शोमध्ये पालक होण्याचे संकेतही दिले. त्यांनी सांगितले की ते लवकरच ही आनंदाची बातमी जाहीर करतील. दरम्यान, परिणीती चोप्राने तिच्या गरोदरपणाच्या प्रवासादरम्यान एक यूट्यूब चॅनेल लाँच केले. सप्टेंबरमध्ये एका व्हिडिओमध्ये तिचा बेबी बंप देखील पहिल्यांदाच स्पॉट झाला. त्यांनी सप्टेंबरमध्ये त्यांचा दुसरा लग्नाचा वाढदिवसही साजरा केला. आता अभिनेत्री लवकरच चाहत्यांना आनंदाची बातमी देणार आहे, ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.