(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी प्राइम व्हिडीओ इंडियाच्या ‘Too Much With Kajol & Twinkle’ या शोमध्ये काजोलने एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.तिच्या या विधानावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक चाहत्यांनी तिच्या या वक्तव्यावर कमेंट्स देखील कोेल्या आहेत. सामान्य लोकांच्या मेहनतीची खिल्ली उडवली असल्याचा आरोप देखील नेटकऱ्यांनी लावला आहे.
या शोमध्ये वरुण धवन आणि आलिया भट सहभागी झाले होते. काजोलसोबत ट्विंकल खन्नादेखील हा शो होस्ट करते. या शोमध्ये काजोल ९ ते ५ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल बरळली आहे. कलाकारांना त्यांच्यापेक्षा जास्त मेहनत करावी लागते, असं ती म्हणाली. तिच्या या वक्तव्याशी ना वरुण सहमत होता ना आलिया. तरीही काजोलने आपलचं वक्तव्य कसं बरोबर, हेही सांगितलं.
काजोलच्या मते, ऍक्टर्स हे 9 ते 5 नोकरी करणाऱ्यांपेक्षा अधिक मेहनतीने काम करतात. तिने स्पष्टपणे म्हटलं की, अभिनय हा एक शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर खूप थकवणारा व्यवसाय आहे, आणि त्यामध्ये सातत्याने नव्याने सादर होणं आवश्यक असतं.मात्र, तिच्या या मताशी शोमध्ये उपस्थित असलेल्या इतर सेलिब्रिटी, होस्ट ट्विंकल खन्ना, गेस्ट वरुण धवन आणि आलिया भट्ट यांनी असं मानण्यास नकार दिला.वरुण आणि आलिया दोघांनीही सांगितलं की, 9 ते 5 नोकऱ्याही तितक्याच आव्हानात्मक असतात, आणि प्रत्येक प्रोफेशनचं एक वेगळं महत्त्व असतं.तरीही काजोल आपल्या मतावर ठाम राहिली आणि म्हणाली की, अभिनयामध्ये शारीरिक थकवा, वेळा न ठरवता सतत शूटिंग, मानसिक दबाव आणि सतत एक परफेक्ट इमेज जपण्याचा ताण हे सगळं खूप मोठं असतं.
‘माझा हात धरून त्यांनी…’, बॉलीवूडचा No 1 हिरो गोविंदाबद्दल काय म्हणाली ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री?
काजोलच्या या विधानावर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक तिला सपोर्ट करत आहेत, तर काहीजण तिच्यावर टीका करत आहेत की, ती सामान्य नोकरी करणाऱ्या लोकांच्या संघर्षाला कमी लेखते, असं देखील काहींनी म्हटलं आहे.
स्पष्टीकरण देत काजोल म्हणाली,”मी 9 ते 5 नोकरी करणाऱ्यांचा पूर्ण आदर करते. त्यांचं वेळेचं आणि जबाबदाऱ्यांचं शिस्तबद्ध जीवन खरोखर कौतुकास्पद आहे.
काय म्हणाली होती काजोल
“अभिनय करत असलो तरी, त्याचबरोबर इव्हेंट्ससाठीही जावं लागतं. १२ ते १४ तास अॅक्टिव्ह राहणं हे खूप कठीण असतं. ९ ते ५ काम करणारे लोक डेस्कवर बसून काम करतात, त्यामुळे त्यांना पूर्ण वेळ शरीराने अॅक्टिव्ह राहावं लागत नाही. ते टी ब्रेक घेऊ शकतात, आराम करू शकतात, कंटाळा आला तर थोडं फिरून येऊ शकतात. आणि त्याच वेळी आपलं कामही पूर्ण करत असतात.”