Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Peddi Movie Collection : ‘आया रे तुफान’! अवघ्या २४ तासांत ‘पेड्डी’ची १०० कोटींच्या क्लबमध्ये धडाकेबाज एन्ट्री

राम चरण आणि जान्हवी कपूरच्या ‘पेड्डी’ ने बॉक्स ऑफिसवर दणक्यात सुरुवात केली आहे. चित्रपटाने अवघ्या २४ तासांत जगभरात १३५.३६ कोटी रुपयांची कमाई केली. भारतात पहिल्या दिवशी ५१ कोटींची नेट कमाई, तर एकूण नेट कलेक्शन ६९.५० कोटींवर पोहोचले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 05, 2026 | 07:15 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण आणि जान्हवी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पेड्डी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफानी सुरुवात करत पहिल्याच दिवशी कमाईचे नवे विक्रम रचण्यास सुरुवात केली आहे. प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत या चित्रपटाने जगभरात तब्बल १३५.३६ कोटी रुपयांची कमाई केली असून, यामुळे तो यंदाच्या वर्षातील सर्वात दमदार ओपनिंग मिळवणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे.

Atul Kulkarni : अभिनेत्याचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? म्हणाला ‘उद्याचा दिवस महत्वाचा! आम्ही अनेक चुका केल्या पण…’

दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या ‘पेड्डी’ने भारतात पहिल्या दिवशी ५१ कोटी रुपयांची नेट कमाई नोंदवली. देशभरातील १२,४१२ शोमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सरासरी ४५.५ टक्के प्रेक्षक उपस्थिती मिळाली. विशेष म्हणजे, अधिकृत प्रदर्शनापूर्वी झालेल्या प्रीमियर शोंमधूनच चित्रपटाने १८.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे भारतातील एकूण नेट कलेक्शन ६९.५० कोटी रुपये, तर ग्रॉस कलेक्शन ८२.४९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

चित्रपटाला सर्वाधिक प्रतिसाद तेलुगू प्रेक्षकांकडून मिळाला. तेलुगू भाषेतील ६,९४४ शोंमध्ये तब्बल ६८ टक्के प्रेक्षक उपस्थिती नोंदवली गेली. आठवड्याच्या कामकाजाच्या दिवशीही इतका मोठा प्रतिसाद मिळणे ही चित्रपटासाठी मोठी जमेची बाजू मानली जात आहे. यामुळे ‘पेड्डी’ला केवळ राम चरणच्या चाहत्यांचाच नव्हे, तर सर्वसामान्य प्रेक्षकांचाही भरघोस पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

हिंदी आवृत्तीची सुरुवात तुलनेने संथ झाली असून पहिल्या दिवशी ३ कोटी रुपयांची कमाई झाली. ४,३३३ शोंमध्ये प्रदर्शित होऊनही हिंदीतील उपस्थिती १६ टक्के राहिली. मात्र, विकेंडमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया आणि तोंडी प्रसिद्धीमुळे या आकड्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कन्नड आवृत्तीने ०.२५ कोटी, तमिळने ०.४५ कोटी आणि मल्याळम आवृत्तीने ०.१० कोटी रुपयांची भर घातली.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘आऊट ऑफ सिलेबस’ चित्रपटाच्या टीमचा हरित उपक्रम; वृक्षारोपणातून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

राम चरणच्या मागील ‘गेम चेंजर’ चित्रपटाशी तुलना केली असता ‘पेड्डी’ची सुरुवात अधिक प्रभावी मानली जात आहे. ‘गेम चेंजर’ने पहिल्या दिवशी जगभरात सुमारे ८० कोटी रुपयांची कमाई केली होती, तर ‘पेड्डी’ने थेट १३५ कोटींचा टप्पा गाठत मोठी झेप घेतली आहे. त्यामुळे आता या चित्रपटाकडून विकेंडमध्ये आणखी मोठ्या कमाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पहिल्याच दिवशी मिळालेल्या प्रतिसादामुळे ‘पेड्डी’ बॉक्स ऑफिसवर दीर्घकाळ दमदार कामगिरी करणार का, याकडे चित्रपटसृष्टीसह चाहत्यांचेही लक्ष लागले आहे. विकेंडनंतर चित्रपट आणखी कोणते विक्रम आपल्या नावावर करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Peddi movie collection for the first day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • Janhvi Kapoor
  • latest movies
  • Ram Charan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.