(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार देवी श्री प्रसाद उर्फ रॉकस्टार डीएसपी यांनी भारताला पुन्हा एकदा अभिमान वाटावा अशी गोष्ट केली आहे. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या ‘मोदी अँड यूएस’ कार्यक्रमात त्यांनी परफॉर्म केल असून ज्यात हजारो लोक उपस्थित होते. त्यांनी आपल्या चार्टबस्टर्सवर आपल्या गायनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंचावर स्वागत करण्यासाठी डीएसपीने ‘हर घर तिरंगा’ हे खास गाणं गायले आणि सगळ्यांना खुश करून टाकले.
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये मोदी आणि डीएसपी एकमेकांना शुभेच्छा देत खास मिठी मारताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या समोर सादरीकरण करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना डीएसपी एका व्हिडिओमध्ये म्हणाला की, “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे न्यूयॉर्कमध्ये स्वागत करण्याच्या या मोठ्या कार्यक्रमाचा भाग म्हणून मी सहभागी झालो या गोष्टीचा मला खूप आनंद झाला आहे. ज्या दिवशी मला हर घर तिरंगा संगीतबद्ध करण्याची संधी मिळाली ती गोष्ट मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी गाणे तयार करण्यात माझे मन आणि आत्मा पणाला लावली आणि आज मला हे गाणे गाण्याची संधी मिळाली. त्यांचे स्वागत करण हा एक प्रतिष्ठित आणि प्रेमळ मिठी मारणारा क्षण होता जो मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही विसरणार नाही.” असे गायकाने सांगितले.
हे देखील वाचा- आयुष्मान खुरानाने पश्मिना रोशनसह “जचडी” या नवीन गरबा गाण्याचे पोस्टर केले लाँच!
या कार्यक्रमात डीएसपी हे एकमेव संगीतकार-गायक होते त्यांनी त्यांचे जागतिक स्तरावर स्वतःच्या गाण्याची जादू दाखवली. आणि अनेक प्रेक्षकांना चकित करून ठेवले. 19 ऑक्टोबरपासून हैदराबादमध्ये तो नव्या इंडिया टूर ची सुरुवात करणार आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2: द रुल’, सुर्याचा ‘कंगुवा’, पवन कल्याणचा ‘उस्ताद भगत सिंग’, धनुषचा ‘कुबेरा’, नागा चैतन्यचा ‘थंडेल’, अजित कुमारचा ‘गुड बॅड अग्ली’, यांतून त्याचे संगीत पाहण्यासाठी चाहते प्रतीक्षा करत आहेत आणि राम चरणचा शीर्षकहीन चित्रपट देखील तो झळकणार आहे.