(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
नवरात्रीचा सण लवकरच जवळ येत आहे आणि हा सण येताच गरबा रास दांडियाची आठवण येते. नवरात्रीच्या नऊ दिवस खूप मोठा जलोष आणि सर्वत्र उत्साह सुरु असतो. याचदाम्यान या वर्षीची नवरात्र थोडी खास ठरणार आहे. कारण, बॉलीवूड गायक आणि अभिनेता आयुष्मान खुराना आणि पश्मिना रोशन यांनी याचे गरबा वरील नवीन गाणे “जचडी” पहिले पोस्टर रिलीज केले असून, लवकरच हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा उर्जेने भरलेला गरबा ट्रॅक नवरात्रीच्या उत्सवासाठी एक परिपूर्ण गाणं ठरणार आहे.
हे गाणे अष्टपैलू कलाकार आयुष्मान खुरानाने गायले आहे आणि त्यात अभिनेत्री पश्मिना रोशन देखील झळकली आहे, अभिनेत्रीने या वर्षी निपुण धर्माधिकारी यांच्या “इश्क विश्क रिबाउंड” या चित्रपटामधून पदार्पण केले आहे. आणि आता नुकतेच ती या गाण्यात चमकणार आहे. हे गाणे एक डान्स ट्रॅक असून, हे गाणं चाहत्यांना वेडे करणार आहे. हे गाणं ऐकू गरबाप्रेमी अचानक थिरकायला लागतील यात शंकाच नाही. आयुष्मान खुराना आणि पश्मिना रोशन या दोघांनीही या गाण्याचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यामध्ये “हे गाणं २७ सेप्टेंबर रोजी रिलीज होणार असून, सोबत राहा.” असे आयुष्मानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
हे देखील वाचा- शाहिद कपूर, राशी खन्नासह हे कलाकार IIFA 2024 मध्ये परफॉर्म करण्यासाठी सज्ज!
“जचडी” चे पोस्टर गाण्याचे भाव सुंदरपणे कॅप्चर करते, दोलायमान रंग आणि सणाचे घटक गरब्याच्या भावनेला उत्तम प्रकारे प्रेक्षकांना या गाण्यात अनुभवता येणार आहे. पोस्टरमध्ये आयुष्मान आणि पश्मिनाची केमिस्ट्री खूप सुंदर दिसून येत आहे, जी प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढवत आहे. हे गाणे केवळ डान्स फ्लोअर्सवर थिरकणार नाही तर नवरात्रीच्या प्लेलिस्टचा एक महत्त्वाचा भाग बनण्याची अपेक्षा आहे. आज पोस्टर रिलीज झाल्यानंतर, चाहते लवकरच या गाण्याच्या अधिकृत लाँचची आतुरतेने वाट पाहू शकतात.