Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

30,000 कोटींच्या कायदेशीर वादात प्रिया कपूरचा मोठा निर्णय; सासूला घराबाहेर काढत RK फॅमिली ट्रस्टमधून केले बेदखल

अभिनेत्री करिश्मा कपूरचे एक्स पती संजय कपूर यांच्या निधनानंतर, त्यांच्या कुटुंबांमध्ये ३०,००० कोटी रुपयांच्या वारसा हक्कावरून वाद सुरू आहे. आता, प्रिया कपूरने आपली सासू राणी कपूर यांना कुटुंबामधून बेदखल केलं आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 26, 2026 | 09:30 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • 30,000 कोटींच्या कायदेशीर वादात प्रिया कपूरचा मोठा निर्णय
  • सासूला RK फॅमिली ट्रस्टमधून केले बेदखल
  • सासू-सुनेचा वाद कोर्टात
 

अभिनेत्री करिश्मा कपूर यांचे एक्स पती संजय कपूर यांचे गेल्या वर्षी जूनमध्ये निधन झाल्यानंतर, त्यांची पत्नी प्रिया सचदेव कपूर सध्या करिश्मा कपूर यांच्या मुलांशी, सासू राणी कपूर आणि बहीण मंधिरा कपूर स्मिथ यांच्यासोबत कायदेशीर वादात अडकल्या आहेत. हा वाद तब्बल ३०,००० कोटी रुपयांच्या वारशावरून सुरू आहे. दरम्यान, आरके फॅमिली ट्रस्टच्या न्यासी आणि लाभार्थी म्हणून कार्यरत असलेल्या प्रियाने २५ मार्च २०२६ पासून राणी कपूर यांना न्यासी पदावरून हटवण्याबाबत अधिकृत नोटीस जारी केली आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, २४ मार्च २०२६ रोजी जारी करण्यात आलेली ही नोटीस ट्रस्टच्या नियंत्रण आणि व्यवस्थापनावरून दोन्ही बाजूंमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आली आहे. राणी कपूर यांनी प्रियाला पदावरून हटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले असून, त्यामुळे दिवंगत संजय कपूर यांच्या मोठ्या व्यावसायिक साम्राज्यावरून सुरू असलेला वाद अधिकच तीव्र झाला आहे.

नव्या मनोरंजनासाठी ‘आई तुळजाभवानी’चा आशीर्वाद; ‘कलर्स मराठी’वर मालिकांची दमदार सुरुवात

राणी कपूर यांच्या कृतींवर चिंता

या माहितीनुसार, आरके फॅमिली ट्रस्टची स्थापना २०१७ मध्ये एक खासगी आणि अपरिवर्तनीय ट्रस्ट म्हणून करण्यात आली होती, ज्यामध्ये दिवंगत संजय कपूर हे एकमेव लाभार्थी होते. जून २०२५ मध्ये त्यांच्या निधनानंतर ट्रस्टमधील लाभकारी हक्क त्यांच्या मुलांकडे मास्टर अजरियास सूरी कपूर, समायरा कपूर आणि मास्टर कियान कपूर हस्तांतरित करण्यात आले. नोटीसमध्ये एकमेव लाभार्थ्याच्या निधनानंतर राणी कपूर यांनी कथितपणे केलेल्या काही कृतींबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच जानेवारी २०२६ मध्ये जारी करण्यात आलेल्या निषेध नोटीचाही उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये राणी कपूर यांनी ट्रस्टच्या वैधतेला आव्हान देत त्याच्या मालमत्तेबाबत दिलासा मागण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

प्रियाने पत्रात काय म्हटलं?

आपल्या पत्रात प्रिया सचदेव कपूर यांनी नमूद केले आहे की, या कृती ट्रस्ट डीडच्या अटींविरुद्ध असून भारतीय ट्रस्ट कायदा, १८८२ मधील तरतुदींचे उल्लंघन करतात आणि लाभार्थ्यांच्या हितालाही बाधा आणतात. ट्रस्ट डीडमधील कलम ८.११ चा उल्लेख करत त्यांनी राणी कपूर यांना ट्रस्टी पदावरून औपचारिकपणे हटवण्याची नोटीस दिली आहे. या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, २५ मार्च २०२६ नंतर राणी कपूर यांना ट्रस्टचे प्रतिनिधित्व करण्याचा किंवा ट्रस्टच्या मालमत्ता, कागदपत्रे किंवा व्यवहारांशी संबंधित कोणताही अधिकार राहणार नाही. तसेच, या तारखेनंतर ट्रस्टच्या नावाने करण्यात आलेली कोणतीही कृती अमान्य मानली जाईल आणि नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

Dhurandhar 2 Collection: रणवीर सिंहचा स्पाय ड्रामा ठरला हिट; 7 दिवसांत 1000 कोटींचा टप्पा पार

सासू-सुनेचा वाद कोर्टात

हा सगळा प्रकार सासू आणि सुनेमधील वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर समोर आला आहे. असेही समजते की, राणी कपूर यांनी ट्रस्टसंदर्भात अनेक पावले उचलली असून त्याचा परिणाम प्रिया सचदेव कपूर यांच्या भूमिकेवर झाला आहे.

Web Title: Priya kapur removes sunjay kapur mother from rk family trust amid 30000 crore legal dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Entertainment News

संबंधित बातम्या

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!
1

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?
2

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती
3

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती

‘Toxic’साठी यशचा मोठा त्याग! नयनताराने सांगितला साडेचार वर्षांचा थक्क करणारा प्रवास
4

‘Toxic’साठी यशचा मोठा त्याग! नयनताराने सांगितला साडेचार वर्षांचा थक्क करणारा प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.