Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘संशय हाच राक्षस आहे!’ सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला Rao Bahadur’च्या प्रदर्शनाची तारीख ठरली, आता गुढ उलघडणार…

महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांच्या ‘जीएमबी एंटरटेनमेंट’ने ‘ए प्लस एस मूव्हीज’ आणि ‘श्रीचक्रास एंटरटेनमेंट्स’सोबत मिळून दिग्दर्शक वेंकटेश महा यांच्या ‘राव बहादूर’च्या जागतिक प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 09, 2026 | 04:15 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘राव बहादूर’च्या जागतिक प्रदर्शनाची अधिकृत घोषणा
  • सोशल मीडियावर तारखेबाबत पोस्ट शेअर
  • संशय हाच राक्षस आहे संकल्पनेवर आधारित
Rao Bahadur’ release date: महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांच्या ‘जीएमबी एंटरटेनमेंट’ने ‘ए प्लस एस मूव्हीज’ आणि ‘श्रीचक्रास एंटरटेनमेंट्स’सोबत मिळून दिग्दर्शक वेंकटेश महा यांच्या बहुप्रतीक्षित मानसशास्त्रीय थरारपट ‘राव बहादूर’च्या जागतिक प्रदर्शनाची अधिकृत घोषणा केली आहे. महेश बाबू प्रस्तुत आणि प्रसिद्ध दिग्दर्शक वेंकटेश महा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला ‘राव बहादूर’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात रोमांचक चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. आता रिलज डेट समोर आल्यामुळे कथेचं गुढ समोर येणार असल्यामुळे आणखीनच उत्सुकता वाढली आहे.

“…डोंगरावर अडकून पडले होते”, Swayambhu च्या चित्रीकरणाचा थरारक अनुभव; दिग्दर्शकाने सांगितला ‘तो’ किस्सा

समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा

चित्रपटाच्या झलक व्हिडिओने एका वेगळ्या, गूढ आणि आकर्षक विश्वाची ओळख करून दिली असून, पडद्यावर नेहमी दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा हा अनुभव पूर्णपणे वेगळा असल्याचे जाणवते. सत्य देव यांच्या प्रभावी रूपांतराने सजलेल्या या झलक व्हिडिओने आपल्या वेगळ्या शैलीमुळे आणि कथनपद्धतीमुळे प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली असून समाजमाध्यमांवरही त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर तारखेबाबत पोस्ट शेअर

आता या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढवत निर्मात्यांनी अधिकृतपणे प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ‘राव बहादूर’ हा चित्रपट ३ जुलै २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असून, यंदाच्या वर्षातील सर्वाधिक प्रतिक्षेत असलेल्या चित्रपटांपैकी तो एक ठरत आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या तारखेची माहिती देण्यात आली. या पोस्टला “एक नवी तारीख. एक अविस्मरणीय चित्रपट अनुभव. ‘राव बहादूर’ ३ जुलै २०२६ पासून जगभरातील चित्रपटगृहांत ” असं कॅप्शन देत तारखेचा उलघडा केला.

संशय हाच राक्षस आहे संकल्पनेवर आधारित

“संशय हाच राक्षस आहे” या संकल्पनेवर आधारित असलेल्या ‘राव बहादूर’च्या झलक व्हिडिओने प्रेक्षकांना एका भयावह आणि अनोख्या जगाची सफर घडवली आहे. मानसशास्त्रीय नाट्य आणि गूढ वास्तववाद यांच्या संगमातून तयार झालेला हा चित्रपट वास्तव आणि अंधार यांच्या संघर्षात अडकलेल्या एका व्यक्तीच्या भावनिक पतनाची कथा मांडताना दिसतो.

दमदार कलाकारांची फळी

यासोबतच, जुन्या ऐश्वर्यशाली परंपरा, खानदानी सत्ता आणि कमी होत चाललेला प्रभाव यांचाही चित्रपटात प्रभावीपणे वेध घेण्यात आला आहे. वेंकटेश महा यांनी स्वतः या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि संकलन केले आहे. भारतीय संस्कृतीच्या मुळाशी जोडलेली, पण जगभरातील प्रेक्षकांना भावणारी ही भावनिक कथा असणार आहे. दमदार कलाकारांची फळी आणि सत्य देव यांची आव्हानात्मक भूमिका यामुळे ‘राव बहादूर’ हा यंदाच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक ठरत आहे.

सुपरस्टार महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांच्या ‘जीएमबी एंटरटेनमेंट’द्वारे सादर होत असलेला ‘राव बहादूर’ हा वेंकटेश महा यांचा पुढील चित्रपट आहे. ‘सी/ओ कांचरपालम’ आणि ‘उमा महेश्वर उग्र रूपस्य’ यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांसाठी वेंकटेश महा ओळखले जातात.

हा चित्रपट तेलुगू चित्रपटसृष्टीतील दोन मोठ्या निर्मितीसंस्था ‘ए प्लस एस मूव्हीज’ आणि ‘श्रीचक्रास एंटरटेनमेंट्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने तयार होत आहे. ‘ए प्लस एस मूव्हीज’ने यापूर्वी ‘जीएमबी एंटरटेनमेंट’सोबत मिळून गाजलेला ‘मेजर’ हा चित्रपट निर्माण केला होता, तर ‘श्रीचक्रास एंटरटेनमेंट्स’ने समीक्षकांची प्रशंसा मिळवलेला ‘केए’ चित्रपट साकारला होता. ‘राव बहादूर’ हा चित्रपट ३ जुलै २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

“तू आनंदी राहणं डिझर्व्ह…”, पती असावा तर असा… बिगबॉस फेम ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी दिलं मोठं गिफ्ट

Web Title: Psychological drama push release to july 3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Hindi Movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.