
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
आज संपूर्ण देशात ख्रिसमस हा सण मोठ्या आनंदात साजरा होत असताना. अनेकजण घरात ख्रिसमस साजरा करताना दिसत आहेत. आणि आता अशातच एक मराठी अभिनेत्यासोबत एक धक्कादायक घटना घडली असल्याचे समजले आहे. अभिनेत्याच्या बिल्डींगला आग लागल्यामुळे तो आणि त्याची मुलगी घरात अडकले असल्याचे अभिनेत्याने सांगितले आहे. अभिनेत्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांची मदत मागितली. आणि त्यानंतर अभिनेत्याला मदत मिळाली आणि सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. अभिनेत्याने झालेल्या नुकसानाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. आणि या सगळ्यांचा खुलासा केला आहे.
अभिनेत्याने सोशल मीडियावर मागितली मदत
मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगच्या मुंबईत घर असलेल्या बिल्डींगला आग लागली होती. अभिनेत्याने आग लागल्यानंतर अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला माझ्या बिल्डींगला आग लागली आहे. मी अडकलो आहे कृपया मदत करा. मी आणि माझी मुलगी आग लागल्यामुळे घरात अडकलो आहोत. सर्वत्र आग लागली आहे असे कॅप्शन असलेली पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. आणि अभिनेत्याला योग्य ठिकाणी हलवण्यात आले आहे.
सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ
यानंतर पुष्करने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर आगीनंतरचा व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये पुष्करच्या घराचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. बाल्कनीतील सर्व काही आगीमुळे काळे झालेले व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने आग वीजवल्याबद्दल खऱ्या अग्निशमन दलाचे आभार मानले. तसेच मुंबई पोलिस आणि बीएमसीचे आभार मानले. अभिनेत्याने असेही म्हटले आहे की माझ्या घराचे नुकसान झाले आहे.
बॉलीवूड थीम मध्ये सजला ‘लक्ष्मीनिवास’ परिवार, लक्ष्मीचा ६० वा वाढदिवस केला साजरा
लोकांनी दिल्या प्रतिक्रिया
अभिनेता पुष्कर जोगने घराला लागलेल्या आगीचीचा व्हिडिओ शेअर केला आणि यावर कमेंट करताना अभिनेत्री स्मिता गोंदकरने लिहिले ‘बापरे तिथे कसे?’ असा प्रश्न विचारला आहे. कमेंट करताना समीर गवळी आणि जिग्नेश यांनी पुष्कर जोगला काळजी घेण्यास सांगितले आहे. परंतु पुष्करच्या घरात आग कशी लागली याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.