Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6: सचिन कुमावतने घराबाहेर पडताच केली ‘बिग बॉस’ची नक्कल; तर, ‘या’ स्पर्धकाला म्हटले दुतोंडी!

सध्या मराठी 'बिग बॉस' हा चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. 'बिग बॉस'चे एव्हिक्शन म्हटले की चाहत्यांना नेहमीच धक्का बसतो. आणि अशातच आता या आठवड्यात खान्देश किंग सचिन कुमावत बाहेर पडले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 25, 2026 | 11:54 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • सचिन कुमावतने केली ‘बिग बॉस’ची नक्कल
  • सचिन कुमावतने ‘या’ स्पर्धकाला म्हटले दुतोंडी
  • सचिन कुमावतने स्वतःच्या खेळाबद्दलही मांडले मत
Bigg Boss Marathi हा रिॲलिटी शो दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत चालला असून घरातील प्रत्येक स्पर्धक आपला गेम मजबूत करण्यासाठी झटताना दिसत आहे. सूत्रसंचालक म्हणून रितेश देशमुखची उपस्थितीही प्रेक्षकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. मात्र सहाव्या आठवड्यात घरातून बाहेर पडलेल्या ‘खान्देश किंग’ सचिन कुमावतच्या एलिमिनेशनने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

The Kerala Story 2 चा टीझर चर्चेत येताच निर्मात्यांनी केला डिलीट? नेमकं सत्य काय आले समोर

घरातील टास्क, वाद आणि मैत्रीच्या समीकरणांमध्ये सचिनने आपली वेगळी छाप पाडली होती. त्याची थेट बोलण्याची शैली, आत्मविश्वासपूर्ण भूमिका आणि खान्देशी अंदाज यामुळे तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळे त्याचा प्रवास सहाव्याच आठवड्यात संपल्याने सोशल मीडियावर नाराजीचे सूर उमटले. आहेत. आता अशातच ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच सचिन यांनी नवराष्ट्रासोबत मनसोक्त गप्पा मारल्या आहेत. तसेच घरातील सदस्यांचा खेळ आणि ‘बिग बॉस’च्या घराबाहेर पडल्याचे दुःख त्यांनी व्यक्त केले आहे.

 

घरातून बाहेर पडताच सचिनने आपल्या भावना व्यक्त केल्या. घरातला दुतोंडी आणि ड्रामा क्वीन कोण आहे? असे विचारले असता त्यांनी म्हटले की, ‘मला दुतोंडी व्यक्ती सुरुवातीला सोनाली राऊत वाटायची, परंतु ती लवकर घराबाहेर पडली. आणि आता मला अनुश्री वाटते पण आता तिचा देखील स्वभाव बदलला आहे, मी घराबाहेर पडताना तिला देखील वाईट वाटले. ती स्वतःमध्ये सुधारणा करतेय हे चांगलं आहे.’ असे ते म्हणाले.

‘या निर्दयी दुनियेत तुमच्या प्रेमाबद्दल मी आभारी…’; Arijit Singh ची चाहत्यांसाठी भावुक पोस्ट, म्हणाला, ‘पुढे काय होईल कोण जाणे!’

तसेच पुढे ‘बिग बॉस’ची नक्कल करताना ते घरामध्ये नक्की कसे बोलतात, ही मिमिक्री करून दाखवताना सचिन कुमावत म्हणाले, ‘काय रे भाऊ सचिन, काय चाली राहिलं तुमलं?, जमी का मले ऐराणी तुम्ही? असेच म्हणतात ‘बिग बॉस’.’ असे सचिन यांनी सांगितले आहे. पुढे गायकाने राखी सावंतची देखील नक्कल केली आहे. आणि ती त्यांना कशी हाक मारते याची मिमिक्री करून दाखवली आहे.

तसेच ‘बिग बॉस’ च्या खेळाबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘जसा मी आहे तसाच मी ‘बिग बॉस’च्या घरात राहिलो आहे. सन्मानाने गेलो आणि सन्मानाने घराबाहेर पडलो यामध्येच मी समाधानी आहे.’ असे ते म्हणाले आहेत. सचिनच्या या वक्तव्यावर चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत. दरम्यान, ‘बिग बॉस’ घरातील खेळ आता अधिकच रंजक टप्प्यात पोहोचला आहे. पुढील आठवड्यांत कोणते नवे ट्विस्ट येणार आणि कोणाची रणनीती यशस्वी ठरणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Navarashtra interview sachin kumavat eliminated bigg boss marathi 6

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.