Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhurandhar 2 च्या सीनवरून वाद; आर. माधवनवर गुरबाणीचा अपमान केल्याचा आरोप, शिवसेना नेत्याने केली माफीची मागणी

आखाती देशांमध्ये 'धुरंधर २' वर बंदी असताना, शिवसेनेनेही या चित्रपटाला तीव्र विरोध दर्शवला आहे. एका शिवसेना नेत्याने नाराजी व्यक्त केली असून निर्मात्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 24, 2026 | 11:23 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • Dhurandhar 2 च्या सीनवरून वाद
  • आर. माधवनवर गुरबाणीचा अपमान केल्याचा आरोप
  • शिवसेना नेत्याने केली माफीची मागणी
 

‘धुरंधर 2’ हा चित्रपट पाकिस्तानविरोधी आशय आणि संवेदनशील विषयांमुळे खाडी देशांमध्ये बॅन करण्यात आला असताना, भारतातही त्यावरून वाद निर्माण होताना दिसत आहेत. सध्या या चित्रपटातील आर. माधवन यांच्या एका सीनवर गुरबाणीचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. शिवसेना नेते गुरजोत सिंग कीर यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवत मेकर्सकडून सार्वजनिक माफीची मागणी केली आहे.

दरम्यान, ‘धुरंधर 2’ बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत असतानाच त्याला ‘प्रोपगंडा फिल्म’ असल्याची टीकाही होत आहे. अवघ्या पाच दिवसांत जगभरात 855 कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर आता या चित्रपटातील एका सीनमुळे वाद अधिकच वाढला आहे. या सीनमध्ये शीख धर्मातील पवित्र गुरबाणीचा कथित अपमान झाल्याचा आरोप असून, यामुळे हा मुद्दा अधिक संवेदनशील बनला आहे.

Dhurandhar 2: रजनीकांत यांचे कौतुक ऐकून भावूक झाला Aditya Dhar; पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या मनातील भावना

‘धुरंधर 2’मधील एका सीन वादात

‘धुरंधर 2’मधील एका सीनवरून हा वाद निर्माण झाला आहे, ज्यामध्ये आर. माधवन यांचे पात्र गुरबाणीचे उच्चारण करताना दिसते. आरोप असा आहे की, या सीनदरम्यान त्यांच्या हातात सिगारेट दाखवण्यात आली आहे. शीख समुदाय आणि काही नेत्यांच्या मते, अशा प्रकारे सीन सादर करणे हे धार्मिक मर्यादांच्या विरोधात आहे. त्यामुळे या दृश्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा दावा केला जात आहे.

 

गुरजोत सिंग कीर यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली नाराजी

शिवसेना नेते गुरजोत सिंग कीर यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी व्हिडिओ शेअर करत संबंधित सीनला आक्षेपार्ह ठरवले आहे. त्यांच्या मते, गुरबाणी ही शीख धर्मातील अत्यंत पवित्र वाणी असून, ती अशा प्रकारे दाखवणे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही. यासोबतच त्यांनी चित्रपट निर्मात्यांनी तात्काळ सार्वजनिक माफी मागावी आणि हा वादग्रस्त सीन हटवावा, अशी मागणीही केली आहे.

‘महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची’ नाटकाची जोरदार चर्चा; मराठी अस्मिता आणि इतिहासाला भिडणारी प्रभावी कलाकृती

इतकेच नव्हे, तर त्यांनी इशाराही दिला की लवकरात लवकर कारवाई झाली नाही, तर या मुद्द्यावर आंदोलन उभारले जाऊ शकते. धार्मिक भावना आणि श्रद्धेशी संबंधित विषयांमध्ये संवेदनशीलता राखणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.

या मुद्द्याबाबत तक्रारही दाखल करण्यात आली

रिपोर्टनुसार, या प्रकरणी तक्रारही दाखल करण्यात आली असून, या तक्रारीत चित्रपटाशी संबंधित व्यक्तींवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, या वादावर अद्याप चित्रपट निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. दरम्यान, ‘धुरंधर 2’चा बॉक्स ऑफिसवर दमदार परफॉर्मन्स सुरू असून, अवघ्या पाच दिवसांत या चित्रपटाने जगभरात सुमारे 856 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Web Title: R madhavan scene sparks controversy shiv sena leader demands for public apology from dhurandhar 2 makers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • R Madhavan

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.