
फोटो सौजन्य - Social Media
MK Stalin बाबत काय म्हणाले Rajinikanth?
Rajinikanth यांनी माजी मुख्यमंत्री MK Stalin बद्दल सांगितले आहे की “MK Stalin यांच्याशी माझे संबंध फार जुने आहेत आणि ते राजकारणापलीकडचे आहेत. मी त्यांची घेतलेली भेट ही केवळ वैयक्तिक होती, त्यामध्ये कोणतेहि राजकीय रंग किंवा उद्देश नव्हता.” MK Stalin आणि Rajinikanth यांच्या भेटीमुळे तामिळनाडूच्या राजकीय वातावरणात चर्चांचे वादळ आले आहे. या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी Rajinikanth यांनी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
Rajinikanth म्हणतात की “मला MK Stalin यांच्या पराभवाचे दुःख आहे.” दरम्यान, त्यांनी CM Joseph Vijay यांच्या विजयाबद्दलही काही विधाने केले आहेत.
CM Joseph Vijay बद्दल काय म्हणाले Rajinikanth?
सध्या तामिळनाडू राज्याची धुरा मुख्यमंत्री म्हणून CM Joseph Vijay यांच्या हातात आहे. Rajinikanth यांनी CM Joseph Vijay यांच्या विजयाबाबत काही वक्त्यव्य केले आहेत. ते म्हणतात की, “जेव्हा माझ्या कानावर विजयच्या विजयाची बातमी आली, तेव्हा मला फार धक्का बसला. मी सध्या राजकरणात नाही आहे. मी गेल्या अनेक महिन्यांपासून राजकारणापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, विजय आणि माझ्यात 28 वर्षांचे वयाचा फरक आहे. राज्यातील दोन बलाढ्य राजकीय पक्षांना सामोरे जाऊन विजयने नवीन ओळख निर्माण केली आहे.”
Rajinikanth यांच्या CM Joseph Vijay यांच्या बाबतीतल्या काही विधानांमुळे सोशल मीडियावर तसेच इतर माध्यमांवर विविध प्रतिक्रिया उमटत होत्या. त्याविषयी सांगताना Rajinikanth म्हणाले की, “विमानतळावर मी विजयला अभिनंदन केले नाही. परंतु, त्याच्या विजयाची बातमी येताच मी ताबडतोब X वर पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या तसेच अभिनंदन केले. मी आता राजकारणात नाही. मी राजकारण सोडलं आहे. आता तुम्हीच सांगा, मी का त्याच्याविषयी ईर्ष्या बाळगू?” Rajinikanth पुढे सांगतात की, “जे एखाद्याच्या भाकितात लिहलं आहे ते घडणारच आहे आणि जे नाही लिहलंय ते नाही.”
एकंदरीत, ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी त्यांच्या पोज गार्डन येथील निवासस्थानी घेतलेल्या या पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे.