(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कॉमेडी कलाकार आणि अभिनेता राजू तालिकोटे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. राजू यांना खांद्याच्या दुखण्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यांना तातडीने उडुपी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला.
Ek Deewane Ki Deewaniyat : संगीताने आधीच जिंकले मनं! चित्रपट प्रदर्शना अगोदरच सुपरहिट
अभिनेता शूटिंगसाठी उडुपी येथे होते
कन्नड अभिनेता राजू तालिकोटे त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी उडुपी येथे आले होते, ज्यामध्ये शाईन शेट्टी मुख्य भूमिकेत आहेत. शूटिंगदरम्यान राजू यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या मते, राजू यांना यापूर्वी एक किंवा दोन हृदयविकाराचे झटके आले होते आणि हा तिसरा हृदयविकाराचा झटका प्राणघातक ठरला. आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
संपूर्ण टीमला बसला धक्का
ज्या टीमसोबत राजू हे शूटिंग करत होते ती संपूर्ण टीमला धक्का बसला आहे. चाहत्यांना विश्वास बसत नाही की अभिनेता आपल्यात नाही. चित्रपट अभिनेता शाईन शेट्टी यांनीही या विषयावर भाष्य केले आणि म्हटले की राजू सरांनी दोन दिवसांचे शूटिंग पूर्ण केले होते आणि नंतर ते आजारी पडले, ज्यामुळे त्यांचे निधन झाले. राजूच्या निधनाने चित्रपटसृष्टीतही शोककळा पसरली आहे. त्यांचे चाहते श्रद्धांजली वाहण्यासाठी सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत आहेत.
राजू तालिकोट कोण होते?
विजयपुरा येथे जन्मलेल्या राजू तालिकोट यांनी २००९ मध्ये “मनसरे” या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी रंगमंचावरून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली असली तरी नंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. “मनसरे” नंतर राजू यांनी “राजधानी”, “मैना”, “लाइफ इज दॅट”, “अलेमारी” आणि “टोपीवाला” सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते टीव्ही रिअॅलिटी शो “बिग बॉस कन्नड” च्या सीझन ७ मध्ये देखील दिसले.