फोटो सौजन्य: Instagram
सोशल मीडियावर सक्रिय असलेली इन्फ्ल्यूएंसर आणि कॉमेडियन सायली राऊत हिने तिच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ती तिच्या कॉलेजमधील प्रियकरासोबत साखरपुड्याच्या सोहळ्यात दिसत आहे. हे फोटोज पोस्ट होताच चाहत्यांनी तिच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला. सायलीने तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,“कॉलेजमधील प्रेमिकापासून ते साखरपुडा होईपर्यंतचा प्रवास, शेवटी ते घडलं, आणि ते अगदी आपल्या स्वप्नांसारखंच होतं.”
सायलीने तिच्या साखरपुड्यात राखाडी रंगाचा डिझाइन गाउन परिधान केला आहे. ज्यात ती खूप छान दिसत आहे. विनीत मुळ्ये असे सायलीच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव आहे. सायली आणि विनिताची भेट मुंबईतील रुपारेल कॉलेजमध्ये झाली आणि तिथेच त्यांच्यात प्रेमसंबंध जुळून आले. सायलीच्या साखरपुड्याबाबत तिच्या चाहत्यांनी तिला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत.






