Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Peddi: तोंडात बिडी, डोळ्यात अंगार; पुष्पाच्या अवतारात परतला राम चरण, नव्या लूकने वेधले लक्ष!

राम चरण आणि जान्हवी कपूर यांच्या बहुप्रतिक्षित 'आरसी १६' चित्रपटाचा पहिला लूक गुरुवारी निर्मात्यांनी प्रदर्शित केला. राम चरणच्या या चित्रपटाचे नाव 'पेडी' असे ठेवण्यात आले आहे. तसेच या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 27, 2025 | 10:53 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

राम चरण आणि जान्हवी कपूर यांच्या बहुप्रतिक्षित ‘आरसी १६’ चित्रपटाचा पहिला लूक गुरुवारी निर्मात्यांनी प्रदर्शित केला. राम चरणच्या या चित्रपटाचे नाव ‘पेडी’ असे ठेवण्यात आले आहे. समोर आलेल्या पोस्टरमध्ये राम चरण तोंडात बिडी घेऊन आणि ‘पुष्पा’ सारखा लूक घेऊन दिसत आहे. या पोस्टरने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. अभिनेत्रीच्या वाढदिवशी या चित्रपटाचे पोस्टर निर्मात्यांनी शेअर केले आहे.

राम चरणचा धक्कादायक लूक
अभिनेता राम चरण आज त्यांचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. या प्रसंगी, निर्मात्यांनी चित्रपटाचे शीर्षक आणि अभिनेत्याचा पहिला लूक त्याच्या चाहत्यांना भेट म्हणून प्रदर्शित केला. यावेळी राम चरणचा लूक खूपच वेगळा आणि आकर्षित दिसत आहे. अभिनेत्याचा हा लूक ‘पुष्पा’ मधील अल्लू अर्जुनच्या लूकसारखाच दिसत आहे. त्याचे तीक्ष्ण डोळे, विस्कटलेले केस, विस्कटलेली दाढी आणि नाकामधील बाली त्याला एका तीव्र अवतारात दाखवत आहेत. गूढतेत भर घालत, दुसऱ्या पोस्टरमध्ये तो एक जुनी क्रिकेट बॅट धरलेला दिसून येत आहे. तसेच पोस्टरमध्ये एक गावातील स्टेडियम आहे जे फ्लडलाइट्सने प्रकाशित झाले आहे. हे चित्र एका ग्रामीण आणि मनोरंजक चित्रपटाचे संकेत देत आहे.

‘स्वरांचा साज त्यात सौंदर्य खास!’; श्रेया घोषाल तू गाण्यात कमाल, रूपात बेमिसाल…

चित्रपट पेड्डीची स्टार कास्ट
राम चरणचा हा चित्रपट मोठ्या बजेट आणि मोठ्या स्टारकास्टसह बनवण्यात आला आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर, शिवा राजकुमार, जगपती बाबू आणि दिव्येंदु शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हे बुची बाबू सना यांनी लिहिले आणि दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. एक खास गोष्ट म्हणजे यात कन्नड मेगास्टार शिवा राजकुमार एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांनी संगीताची जबाबदारी घेतली आहे.

ऐश्वर्या राय बच्चनच्या कारला बसची धडक; कोणतीही जीवित हानी नाही

शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे
राम चरणच्या या चित्रपटाचे हैदराबाद शेड्यूल नुकतेच पूर्ण झाले आहे. शूटिंग पूर्ण होताच त्याचा पहिला लूक रिलीज करण्यात आला. तथापि, त्याचे इतर ठिकाणी चित्रीकरण होणे बाकी आहे. पहिल्या लूकनंतर, चाहते आता त्याच्या ट्रेलरची आणि रिलीज तारखेची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: Ram charan janhvi kapoor buchi babu rc 16 titled peddi first look unveiled see here

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2025 | 10:53 AM

Topics:  

  • Janhvi Kapoor
  • Ram Charan
  • Tollywood Actor
  • tollywood movie

संबंधित बातम्या

‘शक्ती, धैर्य आणि तेजस्वीपणाचे प्रतीक…’ वरुण-लावण्याने जाहीर केले बाळाचे नाव, सांगितला अर्थ
1

‘शक्ती, धैर्य आणि तेजस्वीपणाचे प्रतीक…’ वरुण-लावण्याने जाहीर केले बाळाचे नाव, सांगितला अर्थ

Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Review: कशी आहे चित्रपटाची कथा? प्रेक्षकांच्या उतरला का पसंतीस?
2

Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Review: कशी आहे चित्रपटाची कथा? प्रेक्षकांच्या उतरला का पसंतीस?

‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’च्या प्रमोशनसाठी वरुण-जान्हवीचा मराठमोळा अंदाज, ‘ढगाला लागली कळ’ गाण्यावर जबरदस्त डान्स
3

‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’च्या प्रमोशनसाठी वरुण-जान्हवीचा मराठमोळा अंदाज, ‘ढगाला लागली कळ’ गाण्यावर जबरदस्त डान्स

करूरमधील घटनेमुळे लोकं संतापली, विजयचे रक्ताने माखलेले पोस्टर चर्चेत; ‘मारेकऱ्याला करा अटक…’
4

करूरमधील घटनेमुळे लोकं संतापली, विजयचे रक्ताने माखलेले पोस्टर चर्चेत; ‘मारेकऱ्याला करा अटक…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.