हिंदुस्थानी संगीताचा वारसा जपण्यासाठी प्रत्येक पिढीमध्ये कुणी ना कुणी कोकिळा जन्म घेतेच. भारतरत्न लता मंगेशकर यांच्यानंतर गानकोकीळेचा वारसा जपणारी गायिका म्हणजे श्रेया घोषाल! तिच्या आवाजाच्या जादूने कुणीही भाळून जातात. ऐकणाऱ्याला तिच्या प्रेमात पडावे असे श्रेयाचे मधुर आवाज आहे. गोडव्याबाबतीत अगदी साखरेलाही लाजवेल असा श्रेयाचा आवाज आहे.
गायिका श्रेया घोषालने शेअर केले तिचे नवे फोटोज. (फोटो सौजन्य - Social Media)
गायिका श्रेया घोषालने नुकतेच तिच्या @shreyaghoshal या सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये गायिका फार सुंदर दिसत आहे.
यातील काही photos परफॉर्मन्स करतानाचे आहेत. हे फोटोही अगदी बोलके आहेत. अगदी फोटोतून तिच्या आवाजाच्या कोमलतेची जाणीव होत आहे.
श्रेयाने पोस्टखाली कॅप्शनमध्ये या संपूर्ण Look बद्दल माहिती दिली आहे. तिच्या त्या गोड हसण्याने तिच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत.
या फोटोंमध्ये गायिकेने लाल रंगाचा सुंदर असा लेहेंगा परिधान केला आहे. कॉमेंट्समध्ये चाहत्यांनी या Look ची भरभरून कौतुक केले आहे.
श्रेयाच्या एका चाहत्याने तर तिचा Look पाहून गुलाबाची उपमा दिली आहे. फोटोंनी तासाभरातच 50k लाईक्सचा आकडा पार केला आहे.