(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
दिवाळीच्या दिवशी दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून खळबळ उडाली आहे. लाखो लोकांनी त्यांची पोस्ट पाहिली आणि त्यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राम गोपाल वर्मा यांनाही तीव्र टीकेचा सामना करावा लागला आहे. दिग्दर्शकाने दिवाळीच्या निमित्ताने ध्रुमपान बद्दल लिहिताना दिसले आहेत. ते वाचल्यानंतर वापरकर्त्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.
२० नोव्हेंबरच्या रात्री सुमारे ८ वाजले होते. सर्वांच्या घरी दिवाळीची प्रार्थना सुरू होती. दरम्यान, राम गोपाल वर्मा यांनी इन्स्टाग्रामवर दिवाळीची तुलना गांजाशी करत पोस्ट केली. ही पोस्ट वाचून लोक हैराण झाले आहेत. आणि त्यांना आता टट्रोल करू लागले आहेत. तसेच ते नक्की काय म्हणाले हे आपण जाणून घेणार आहोत.
राम गोपाल वर्मा यांची दिवाळी पोस्ट चर्चेत
राम गोपाल वर्मा यांनी लिहिले, “भारतात दिवाळी फक्त एक दिवस असते. गाजामध्ये, दररोज दिवाळी असते.” ही पोस्ट लिहिल्यानंतर त्यांनी आगीचा इमोजी देखील वापरला. दिवाळीच्या रात्री ही पोस्ट व्हायरल झाली आणि त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
राम गोपाल झाले ट्रोल
गाझा बद्दलची ही पोस्ट वाचल्यानंतर बहुतेक वापरकर्त्यांनी त्यांच्यावर टीका केली. एका वापरकर्त्याने लिहिले, “तुम्हाला एक चांगला माणूस बनण्यासाठी वर्षानुवर्षे लागतील. तुम्हाला उत्सव आणि विनाश यातील फरक माहित नाही. अन्यथा, तुम्ही कधीही अशा गोष्टी बोलल्या नसत्या.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “सर्वांचे लक्ष वेधण्याचा हा एक घृणास्पद मार्ग आहे. तुम्हाला पुरस्कार मिळाला पाहिजे.”
लोक काय म्हणाले
दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “दिवाळी हा आशा, प्रकाश आणि आनंदाचा सण आहे. तुम्हाला गाझामध्ये काय चालले आहे हे माहित आहे का? तुम्हाला कदाचित आनंद आणि विनाश यातील फरक माहित नसेल.” दुसऱ्याने लिहिले, “तुम्ही तुमच्या चित्रपटांपेक्षा वाईट आहात. तुमचे मन कचऱ्याने भरलेले आहे, जे मला आश्चर्यचकित करते.” लेखक अशोक कुमार पांडे यांनीही दिग्दर्शकावर टीका केली आणि म्हटले की त्यांनी कधीच कल्पना केली नव्हती की तो असा होईल. एका चाहत्याने म्हटले की गाझामध्ये मानवतेची आवश्यकता आहे. युद्धात उत्सवाचे वातावरण नसते.