(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
राम गोपाल वर्मा त्यांच्या विधानांमुळे अनेकदा चर्चेत येत असतात. अलिकडेच राम गोपाल वर्मा यांनी दीपिका पदुकोण आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यात कामाच्या शिफ्टवरून वाद झाला होता. जो दीर्घकाळ चालू होता. तसेच या वादावर अनेक कलाकार दीपिकाला पाठिंबा देताना दिसले आता याचदरम्यान दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी यावर आपले मत मांडले आहे. आणि ते नक्की काय म्हणाले आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.
तमिळ अभिनेत्री B. Saroja Devi यांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अभिनेता म्हणू शकतो की त्याला फक्त एक तास काम करायचे आहे
अलीकडेच, हिंदुस्तान टाईम्सशी झालेल्या संभाषणादरम्यान, राम गोपाल वर्मा म्हणाले, ‘मी असे म्हटले की मला २३ तास काम करायचे आहे. आणि त्याच वेळी, अभिनेता म्हणाला की त्याला फक्त एक तास काम करायचे आहे. हा त्याचा निर्णय आहे. पण एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला कोणतेही काम करण्यास कसे भाग पाडू शकते? आणि ते एकमेकांसोबत काम करण्यास सहमत होऊ शकतात की नाही हा त्यांचा निर्णय आहे. पण नंतर ही गोष्ट अतिशयोक्तीपूर्ण करण्यात आली आहे.’ संदीप रेड्डी वांगा आणि दीपिका पदुकोण यांच्यातील वादाबाबत राम गोपाल वर्मा यांनी त्यांचे हे बोलून मत मांडले आहे.
दीपिका पदुकोण आणि संदीप रेड्डी वांगा यांच्यात काय होते प्रकरण
संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ चित्रपटात काम करताना दीपिका पदुकोणने फक्त ६ ते ८ तास शूटिंग करण्याची मागणी केली होती. याचे कारण म्हणजे तिला तिची मुलगी दुआला वेळ द्यायचा होता आणि ती नेहमीच शूटिंगवर राहू इच्छित नव्हती. यानंतर, ‘स्पिरिट’ चित्रपटातून तिला काढून टाकण्यात आले, तिच्या जागी तृप्ती डिमरीला घेण्यात आले. नंतर संदीप रेड्डी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील केली, ज्यामध्ये त्यांनी दीपिकाबद्दल वाईट गोष्टी सांगितल्या. त्यानंतरच या वादाला वेग आला आणि अनेकांनी दीपिका पदुकोणला पाठिंबा दिला.
शूटिंग दरम्यान स्टंटमॅन एसएम राजूचा अपघाती मृत्यू; अभिनेता विशालने पुढे केला मदतीचा हात
आता दीपिका या आगामी चित्रपटामध्ये दिसणार
संदीप रेड्डी वांगा यांच्या चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर, दीपिका पदुकोण अॅटली दिग्दर्शित ‘AA22xA6’ चित्रपट करत आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन मुख्य भूमिका साकारत आहे. दीपिका पदुकोण देखील सध्या या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. तसेच या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच हा चित्रपट कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी ते उत्सुक आहेत.