(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
कोटा श्रीनिवास यांच्या निधनानंतर, दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ तमिळ चित्रपट अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे आज वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी ७ दशकांच्या कारकिर्दीत २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांच्या या जाण्याच्या बातमीने इंडस्ट्रीमध्ये सोशल पसरली आहे.
वयाच्या १७ व्या वर्षी कारकिर्दीला सुरुवात
‘अभिनय सरस्वती’ आणि ‘कन्नडथु पेंगिली’ यासारख्या उपाधींनी ओळखल्या जाणाऱ्या बी. सरोजा या दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रमुख व्यक्तिरेखा होत्या. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी कन्नड, तमिळ, तेलगू आणि हिंदी भाषांमधील २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. सरोजा देवी यांनी १९५५ मध्ये अवघ्या १७ व्या वर्षी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांचा पहिला चित्रपट कन्नड चित्रपटातील क्लासिक ‘महाकवी कालिदास’ होता. १९५८ मध्ये ‘नादोडी मन्नन’ या चित्रपटातून त्यांना प्रसिद्धी मिळाली, ज्यामध्ये त्या एम.जी. रामचंद्रन यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसल्या. त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. या बातमीने आता त्यांचे चाहते दुःख व्यक्त करत आहेत.
दिलीप कुमार यांच्यासोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण केले
बी. सरोजा देवी यांनी १९५९ मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पैगम’ चित्रपटात त्या दिलीप कुमार यांच्यासोबत दिसल्या. त्यानंतर त्यांनी ‘ससुराल’, ‘प्यार किया तो डरना क्या’ आणि ‘बेटी बेटे’ सारखे हिंदी चित्रपट केले. त्यांच्या कारकिर्दीत बी. सरोजा देवी यांनी दिलीप कुमार व्यतिरिक्त राज कपूर, शम्मी कपूर आणि सुनील दत्त सारख्या हिंदी स्टार्ससोबत काम केले. बी. सरोजा देवी १९५० च्या दशकात कन्नड, तमिळ, तेलुगू आणि हिंदीमध्ये काम करणाऱ्या मोजक्या नायिकांपैकी एक आहेत. ‘नादोडी मन्नन’ चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर, बी. सरोजा देवी यांना कन्नड चित्रपटसृष्टीत इतर कलाकारांसोबत कास्ट केले जाऊ लागले आणि त्यांनी भरपूर हिट चित्रपट दिले. बी. सरोजा देवी एमजीआरसाठी लकी मॅस्कॉट बनल्या. अभिनेत्रीने त्यांच्यासोबत २६ चित्रपटांमध्ये काम केले. आणि सगळे हिट चित्रपट दिले आहेत.
दिल्ली सरकारकडून मुलांना दाखवला जाणार ‘Tanvi The Great’ चित्रपट, मुख्यमंत्र्यांनी दिला आदेश
बी. सरोज देवी यांच्याकडे मुख्य अभिनेत्री म्हणून सर्वाधिक चित्रपट
बी. सरोज देवी त्यांनी १९५५ ते १९८४ पर्यंत १६१ चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत सरोज देवी यांना चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल अनेक सन्मान मिळाले. १९६९ मध्ये त्यांना पद्मश्री आणि १९९२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय, त्यांना तामिळनाडूचा कलैमामणी पुरस्कार आणि बंगळुरू विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळाली.