(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या नात्याबद्दल अनेक वर्षांपासून चर्चा सुरू होती. अनेक वेळा त्यांनी नात्याबाबत स्पष्ट उत्तर दिले नाही. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर रश्मिकाआणि विजय दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या लग्नाची तारीखही जवळपास निश्चित झाली आहे.विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी शुक्रवारी गुपचूप साखरपुडा केला आहे. हा साखरपुडा दोन्ही कुटुंबीय आणि दोघांच्या केवळ जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत झाला. अद्याप त्यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आलेले नाहीत.कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत या जोडीने नवीन प्रवासाची सुरुवात केली आहे. मात्र, याची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
फॅनच्या हास्यासाठी ‘इन्स्पेक्टर मंजू’चा प्रवास, “श्रियाला भेटून पाणावले डोळे”
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा साखरपुडा हा अतिशय खासगी समारंभ होता. या कार्यक्रमात मीडिया वा फोटोग्राफर्सना कोणतीही परवानगी नव्हती, आणि याबाबत कोणतीही सार्वजनिक चर्चा होऊ नये याची विशेष काळजी घेण्यात आली होती.फक्त दोन्ही कुटुंबांतील सदस्य आणि अगदी निवडक मित्रमंडळींचीच उपस्थिती या साखरपुड्यात होती.
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमात महेश मांजरेकर साकारणार कधीही न साकारलेली भूमिका… जोरदार चर्चा!
विजय देवरकोंडा हा दक्षिण चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेला अभिनेता आहे. त्याने आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात ‘पेली चूपुलु’ या चित्रपटातून केली आणि त्यानंतर ‘अर्जुन रेड्डी’ या धडाकेबाज चित्रपटामुळे तो प्रचंड चर्चेत आला. पुढे आलेला ‘गीता गोविंदम’ हाही सुपरहिट ठरला आणि विजयला प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच ओळख मिळाली.
रश्मिका मंदाना हिने आपल्या करिअरची सुरुवात कन्नड चित्रपट ‘किरिक पार्टी’ मधून केली. तिच्या निरागसतेमुळे आणि दमदार अभिनयामुळे तिला ‘नॅशनल क्रश’ अशी ओळख मिळाली. तिच्या ‘पुष्पा’ फ्रँचायझीतील श्रीवल्लीसारख्या भूमिकेने तिला पॅन-इंडिया ओळख मिळवून दिली.