Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘धुरंधर’मधील रणवीर सिंहच्या अभिनयाची चर्चा; ‘धुरंधर: द रिवेंज’साठी वाढली प्रेक्षकांची उत्सुकता

लवकरच रिलीज होणाऱ्या ‘धुरंधर: द रिवेंज’बद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या रिलीजची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी हमझा या पात्राबद्दलची उत्सुकताही शिगेला पोहोचत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 12, 2026 | 02:13 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

‘धुरंधर’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे. चित्रपटातील अ‍ॅक्शन, भावनिक क्षण आणि थरारक कथानकामुळे प्रेक्षकांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला. विशेषतः रणवीर सिंहने साकारलेला हमझा हे पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला आहे. त्याच्या तीव्र आणि प्रभावी अभिनयामुळे चित्रपटातील अनेक सीन प्रेक्षकांच्या अजूनही आठवणीत आहेत.

थिएटरमध्ये मोठे यश मिळवल्यानंतर हा चित्रपट घराघरात चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी चित्रपटातील क्लिप्स, फोटो आणि आपापल्या प्रतिक्रिया शेअर करत हमझाच्या पात्राबद्दल कौतुकाचा वर्षाव केला. हमझा हे पात्र कमी बोलणारे असले तरी त्याच्या शांततेत दडलेली वेदना आणि राग प्रेक्षकांना स्पष्ट जाणवतो. रणवीर सिंहने संयमित पण अत्यंत प्रभावी अभिनयाच्या जोरावर हे पात्र जिवंत केले आहे.

‘धुरंधर: द रिवेंज’बद्दल वाढती उत्सुकता

आता या चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा अधिकच रंगू लागली आहे. ‘धुरंधर: द रिवेंज’ या सिक्वेलबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. इंडस्ट्रीतील जाणकारांच्या मते, हा चित्रपट वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक ठरू शकतो. प्रीव्यूला मिळालेला जबरदस्त प्रतिसाद आणि विविध बाजारपेठांमध्ये झालेली मोठ्या प्रमाणावर अ‍ॅडव्हान्स बुकिंग यामुळे या चित्रपटाभोवतीचा उत्साह आणखी वाढला आहे. जर चित्रपट रिलीज झाल्यानंतरही अशीच गती कायम राहिली, तर रणवीर सिंह भारतीय सिनेमातील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक म्हणून आपली जागा अधिक भक्कम करू शकतात, असे अनेकांचे मत आहे.

अक्षय कुमारच्या ‘Bhooth Bangla’चा टीझर रिलीज; हॉरर-कॉमेडीचा तडका, ‘भूल भुलैया’ची दिसली झलक

चित्रपटातील सर्वात भयावह आणि भावनिक दृश्यांपैकी एक म्हणजे हमझा एका अंधाऱ्या खोलीत एकटा बसून डायरी लिहितो तो प्रसंग प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहे. त्याच्यावर झालेल्या हल्ल्यांनंतर त्याच्या मनात साचलेली वेदना या दृश्यात हळूहळू उफाळून येते. खिडकीतून येणारा लाल प्रकाश आणि शांत वातावरण या दृश्याला अधिक प्रभावी बनवतात.

26/11 चे भयावह स्वप्न

एका अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या दृश्यात हमझा आपल्या रक्ताने माखलेल्या हातांकडे पाहत असतो, तर पार्श्वभूमीत 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांचे खरे ऑडिओ ऐकू येतात. या संपूर्ण दृश्यात गोंधळ, धक्का आणि असहाय्य राग रणवीर यांच्या चेहऱ्यावरच्या भावांमधून स्पष्ट दिसतो. थरथरणारे ओठ आणि दूरवर रोखलेली नजर त्या भीषण घटनेच्या आघाताला प्रभावीपणे व्यक्त करतात, ज्यामुळे हा चित्रपटातील सर्वात भावनिक आणि प्रभावी क्षण ठरतो.

अ‍ॅक्शनचा तुफान

चित्रपट भावनिक क्षणांनी भरलेला असला तरी त्यात जबरदस्त अ‍ॅक्शनही आहे. एका चर्चित सिक्वेन्समध्ये हमझा बंदुका घेऊन शत्रूंच्या मध्ये शिरतो आणि घूंसे-लाथांच्या जोरावर भीषण लढाई सुरू होते. यावेळी चित्रपटाचा दमदार टायटल ट्रॅक आणि रणवीर यांचा आयकॉनिक हेअर-फ्लिप सीन वातावरण अधिकच रोमांचक बनवत आहे. रणवीर यांनी केलेली शारीरिक मेहनत इथे स्पष्ट दिसते, प्रत्येक मूव्ह आणि प्रत्येक वार अत्यंत कच्चा आणि तीव्र वाटतो, ज्यामुळे हा सीन प्रेक्षकांना प्रचंड ऊर्जा देणारा ठरतो.

‘झी चित्रगौरव पुरस्कार २०२६’च्या मंचावर घुमणार मराठीचा हुंकार; गाजणार मराठीचा सन्मान!

रहमान डकैतशी सामना

चित्रपटातील तणावाचा कळस तेव्हा गाठला जातो जेव्हा हमझाचा सामना रहमान डकैतशी होतो. ही भूमिका अक्षय खन्नाने साकारली आहे. या दृश्यात दोघांमधील टकराव हा केवळ अ‍ॅक्शनचा नसून मानसिक लढाईचा असतो. रणवीर सिंह हमझाच्या शांत चेहऱ्यामागे दडलेले वादळ प्रभावीपणे दाखवतात. त्यांची हलकी स्मितरेषा आणि तीक्ष्ण संवाद या दृश्यात प्रचंड तणाव निर्माण करतात.

‘धुरंधर’ला प्रेक्षकांकडून सतत मिळणारे प्रेम आणि रणवीर सिंह यांच्या अभिनयाची होत असलेली प्रशंसा यामुळे या चित्रपटाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. आता ‘धुरंधर: द रिवेंज’ रिलीजपूर्वीच प्रीव्यू आणि अ‍ॅडव्हान्स बुकिंगचे विक्रम मोडत असल्याने काहीतरी मोठे घडण्याची शक्यता आहे.

Web Title: Ranveer singh dhurandhar best scenes hamza character

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

भरत दाभोळकरांची मराठी रंगभूमीवर ‘हेरगिरी चालू आहे’! स्वतः रिक्षा चालवत गाठलं नाट्यगृह; पाहा हटके प्रमोशन
1

भरत दाभोळकरांची मराठी रंगभूमीवर ‘हेरगिरी चालू आहे’! स्वतः रिक्षा चालवत गाठलं नाट्यगृह; पाहा हटके प्रमोशन

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत मोठा ट्विस्ट? ही लोकप्रिय अभिनेत्री घेणार एक्झिट; हे आहे कारण
2

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत मोठा ट्विस्ट? ही लोकप्रिय अभिनेत्री घेणार एक्झिट; हे आहे कारण

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मध्ये मोठा ट्विस्ट! 18 वर्षांनंतर बापूजींचा मृत्यू? जेठालालचा आक्रोश, प्रोमोने उडवली खळबळ
3

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मध्ये मोठा ट्विस्ट! 18 वर्षांनंतर बापूजींचा मृत्यू? जेठालालचा आक्रोश, प्रोमोने उडवली खळबळ

Raj Sharma Passes Away : कॉमेडियन राज शर्मा यांचे निधन; ५०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, वीर दासची भावनिक पोस्ट
4

Raj Sharma Passes Away : कॉमेडियन राज शर्मा यांचे निधन; ५०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, वीर दासची भावनिक पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.