(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
‘भूत बांगला’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या खास शैलीतील विनोद आणि रहस्याचा संगम या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याची झलक टीझरमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाद्वारे अक्षय कुमार पुन्हा एकदा हॉरर-कॉमेडी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
टीझरमध्ये दिसली कथा अनोखी झलक
आतापर्यंत “भूत बांगला”च्या कथेबाबत फारशी माहिती समोर आली नव्हती. मात्र आज प्रदर्शित झालेल्या टीझरमुळे चित्रपटाच्या शैलीची आणि कथानकाची एक झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. टीझरमध्ये एक जुनाट, गूढ आणि थोडासा भयावह असा बंगला दाखवण्यात आला आहे. या बंगल्यात घडणाऱ्या विचित्र घटनांमुळे वातावरणात रहस्य आणि भीतीचे सावट निर्माण होताना दिसते.
टीझरची सुरुवात शांत आणि थोडी भेसूर वातावरणाने होते. पण काही क्षणांतच अक्षय कुमारचा हटके अंदाज आणि त्याचा विनोदी स्वभाव प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसत आहे. एका बाजूला भीतीदायक प्रसंग तर दुसऱ्या बाजूला हलकाफुलका विनोद दिसून येत आहे. असा अनोखा संगम या टीझरमध्ये दिसतो. पाहायला मिळाला आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना हसवतानाच थोडीशी भीतीही दिसत आहे.
अक्षय कुमारचा वेगळा लूक चर्चेत
टीझरमध्ये सर्वात जास्त चर्चा होत आहे ती अक्षय कुमारच्या लूकची. या चित्रपटात त्याचा अवतार आधीपेक्षा खूप वेगळा दिसत आहे. त्याचा हावभाव, संवादफेक आणि विनोदी टायमिंग यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा त्याच्या कॉमिक शैलीची आठवण झाली आहे. विशेष म्हणजे, टीझर पाहताना अनेकांना ‘भूत बांगला’ या चित्रपटाची आठवण झाली असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिसत आहेत.
स्टारकास्टची दमदार फौज
या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अनेक दमदार कलाकारांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. ज्येष्ठ अभिनेते परेश रावल, तब्बू, वामिका गब्बी आणि राजपाल यादव यांच्याही भूमिका पाहायला मिळणार आहेत. या सर्व कलाकारांची झलकाही टीझरमध्ये पाहायला मिळालाय आहे. याशिवाय ज्येष्ठ अभिनेते असरानी देखील या चित्रपटात दिसणार आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले होते. त्यामुळे हा चित्रपट त्यांच्या चाहत्यांसाठी भावनिक ठरण्याची शक्यता आहे. तसेच “भूत बांगला” हा चित्रपट १० एप्रिल २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.






