
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
‘छावा’ चित्रपटाच्या काही दिवस आधी, संभाजी महाराजांच्या भूमिकेत असलेल्या विकी कौशलचे अनेक नवीन पोस्टर्स प्रदर्शित झाले. तसेच आज काही मिनिटांपूर्वीच, महाराणी येसूबाईच्या भूमिकेतील रश्मिका मंदानाचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. तसेच, निर्मात्यांनी छावा चित्रपटाच्या ट्रेलरबद्दलही माहिती दिली आली आहे की छावा चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार आहे. रश्मिका मंदानाचा हा लुक पाहून चाहते चकित झाले आहेत. अभिनेत्री या भूमिकेत अगदी शोभून दिसत आहे.
‘आम्हाला एकटे सोडा’ सैफ अलीवरील हल्ल्यानंतर, पापाराझींच्या या कृत्यावर संतापली करीना कपूर!
मॅडॉक फिल्म्सने अलीकडेच ‘छावा’ चित्रपटातील रश्मिका मंदानाचा लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले की, ‘प्रत्येक महान राजामागे, अतुलनीय शक्ती असलेली एक राणी उभी असते.’ स्वराज्याचा अभिमान महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत रश्मिका मंदान्ना दिसणार.’ असे लिहून निर्मात्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. तसेच या पोस्टने चाहते आता चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. मॅडॉक फिल्म्सने ‘छावा’ चित्रपटातील महाराणी यशुबाईच्या भूमिकेत रश्मिकाचे दोन पोस्टर्स रिलीज केले आहेत. एका पोस्टरमध्ये रश्मिका मंदान्ना हसताना दिसत आहे. या नवीन लूकमध्ये, रश्मिका जड दागिन्यांसह सुंदर दिसत आहे. तर आणखी एक फोटो आहे ज्यामध्ये रश्मिका खूप गंभीर असल्याचे दिसून येत आहे.
रश्मिकाच्या या लूकसोबतच, चित्रपट निर्मात्यांनी अशी माहिती देखील शेअर केली आहे की ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. मॅडॉक फिल्म्सने छावाची निर्मिती केली आहे. त्याचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी केले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर २२ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. जो पाहण्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत.
रिंकू राजगुरू बनली करवली, ‘आई’च्या लग्नाचे फोटो झाले व्हायरल; सौंदर्याची खाणच जणू
छावा व्यतिरिक्त, विकी कौशल दिग्दर्शक अमर कौशिक यांच्या महाअवतार चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात विकी चिरंजीवी भगवान परशुरामांच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे, ज्यामध्ये विकीच्या लूकचे खूप कौतुक झाले आहे. हा चित्रपट महावतार योद्धा चिरंजीवी परशुराम यांच्या कथेवर आधारित असणार आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये ख्रिसमसला चिनेगृहात प्रदर्शित केला जाणार आहे.