Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP सोबत खांद्याला खांदा लावून उभे ‘हे’ सुपरस्टार! Richa Chadha ने दिले समर्थन; म्हणाली ‘मी ऑकलँड…’

नीट पेपर लीक प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे होत असलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनाला अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. अभिनेत्री ऋचा चड्ढा हिने विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहत शांतता, संवेदनशीलता आणि समजूतदारपणाने भूमिका मांडण्याचे आवाहन केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 06, 2026 | 04:47 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • देशभरातील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत असताना अनेक सेलिब्रिटीदेखील त्यांच्यासोबत उभे राहताना दिसत आहेत.
  • शांतता, संवेदनशीलता आणि समजूतदारपणाने आपली भूमिका मांडावी.
  • एक हजारांहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांची तैनाती करण्यात आली आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे ६ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनाला मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे. नीट पेपर लीक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत असताना अनेक सेलिब्रिटीदेखील त्यांच्यासोबत उभे राहताना दिसत आहेत.

Neha Kakkar Birthday: आर्थिक तंगी, 4 वर्ष गात राहिली भजन; शो मधून बाहेर पण झाली त्याच शो ची परीक्षक, नेहा कक्करचा प्रवास

अभिनेत्री ऋचा चड्ढा हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. सध्या ती न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे असली तरी तिचे मन दिल्लीतील तरुणांसोबत असल्याचे तिने म्हटले. दिल्ली हे तिच्या बालपण, शालेय आणि महाविद्यालयीन जीवनाशी जोडलेले शहर असल्याचे सांगत तिने युवकांना प्रेम आणि शुभेच्छा पाठवल्या. युवकांनी केवळ दिखाऊ देशभक्ती न करता खऱ्या अर्थाने देशासाठी उभे राहावे, तसेच शांतता, संवेदनशीलता आणि समजूतदारपणाने आपली भूमिका मांडावी, असे आवाहन तिने केले.

अभिनेता अतुल कुलकर्णी यानेदेखील या आंदोलनाला समर्थन देत एक भावनिक पोस्ट लिहिली. देशातील तरुण आपला आवाज बुलंद करण्यासाठी आणि आपल्या हक्कांसाठी उभे राहत असल्याचे पाहून आशा वाटत असल्याचे त्याने नमूद केले. आपल्या पिढीकडून तसेच आधीच्या काही पिढ्यांकडून अनेक चुका झाल्या असून त्याचे परिणाम आजच्या तरुणांना भोगावे लागत असल्याची कबुली देत त्याने युवकांची माफी मागितली. तरुणांनी प्रामाणिकपणा, करुणा आणि जबाबदारीच्या भावनेने देशाला नवी दिशा द्यावी, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली.

I am in beautiful Auckland right now with perhaps the cleanest air in the world. But I got Dilli on my mind. My beloved Delhi, city of my childhood, my school, my college…With huge parks and mature, kind trees… sending love to the youth of my country! May you choose to be true… — RichaChadha (@RichaChadha) June 6, 2026

प्रेक्षकांच्या नाराजीमुळे सिनेमात होणार बदल? Janhvi Kapoor चे ते Bold Seen चर्चेत; दिग्दर्शकाने मागितली माफी

याशिवाय अभिनेत्री कुनिका सदानंद आणि अभिनेते प्रकाश राज यांनीदेखील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. देशातील युवकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करत त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत व्यक्त केले. लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या जात नसतील, तर त्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतो, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. जंतर-मंतर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एक हजारांहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांची तैनाती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाकडे देशभराचे लक्ष लागले असून त्यावर सरकारची भूमिका काय असेल, याची उत्सुकता वाढली आहे.

Web Title: Richa chadha extended her support to the cockroach janata partys protest in delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 04:47 PM

Topics:  

  • Cockroach Janta Party
  • Richa Chadha

संबंधित बातम्या

Cockroach Janta Party Protest: ‘शांततेत आंदोलन करा, कायदा हातात घेऊ नका’; अभिजीत दीपके यांचे तरुणांना आवाहन
1

Cockroach Janta Party Protest: ‘शांततेत आंदोलन करा, कायदा हातात घेऊ नका’; अभिजीत दीपके यांचे तरुणांना आवाहन

Cockroach Janata Party: ‘कॉकरोच जनता पार्टी’चे प्रवक्ते नेमके किती शिकलेत? वाचा त्यांची शैक्षणिक पात्रता!
2

Cockroach Janata Party: ‘कॉकरोच जनता पार्टी’चे प्रवक्ते नेमके किती शिकलेत? वाचा त्यांची शैक्षणिक पात्रता!

Cockroach Janta Party : ‘कॉकरोच घाबरतही नाहीत…’ जंतर-मंतरवर अभिजीत दीपके यांची हुंकार, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
3

Cockroach Janta Party : ‘कॉकरोच घाबरतही नाहीत…’ जंतर-मंतरवर अभिजीत दीपके यांची हुंकार, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

CJP Protest : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे शेअर बाजारात धाकधूक? गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
4

CJP Protest : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे शेअर बाजारात धाकधूक? गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.