
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संधेला २०२६चे पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये उत्तर प्रदेशला एक पद्म विभूषण आणि दहा पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी माजी प्राध्यापक मंगला कपूर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संगीत क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट उपक्रमाबद्दल त्यांचा गौरव केला. प्राध्यापक मंगला कपूर यांच्या जीवनावर आधारित ‘मंगला’ हा मराठी चित्रपट बराच चर्चेत आला. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांच्यावर ऍसिड हल्ला झाला आणि त्यांचे संपूर्ण जीवन उध्वस्त झाले.
खूप त्रास आणि वेदना सहन कराव्या लागल्या. समाजाकडून त्यांना तुच्छतेची वागणूक मिळाली अशा परिस्थितीत त्यांनी मोठ्या जिद्दीने उभ्या राहत आपल्या जीवनाला वेगळा आयाम दिला. त्यांच्या जीवन प्रवासाची कथा आणि व्यथा मांडणारा हा चित्रपट म्हणजेच ‘मंगला’. या चित्रपटात मंगला कपूर यांची भूमिका अभिनेत्री शिवाली परब हिने साकारली होती. या चित्रपटात मंगला देशपांडे या भूमिकेतून त्यांचा प्रवास समोर आला. ‘मंगला’ या चित्रपटातून मंगला कपूर यांच्या खऱ्या आयुष्यातील प्रवासाची झलक पाहायला मिळाली आणि त्यांच्या प्रत्येक कामा प्रतीचे त्यांच्या वर आलेल्या संकटाप्रतीचे प्रतीक म्हणूनच त्यांना पद्मश्री हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
प्राध्यापक कपूर यांच्या जीवनावर आधारित ‘मंगला’ हा चित्रपट आहे. माजी प्राध्यापक मंगला कपूर पुरस्कार मिळाल्याबाबत बोलताना म्हणाल्या, “मला या सन्मानासाठी पात्र मांडल्याबद्दल सर्वांचे आभार”. त्यांच्या जीवनावर आधारित ‘मंगला’ मराठी चित्रपटाने त्यांच्या खऱ्या आयुष्यातील प्रवासाचे हुबेहूब दर्शन घडवलं. या चित्रपटाच्या निर्मात्या अपर्णा हौशिंग यांनी प्रतिक्रिया देत असं म्हटलं की, “मंगला कपूर यांच्या जीवन प्रवासाचा मला भाग होता आलं हे माझं भाग्यच.
‘मंगला’ हे या मराठी चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळताना देखील त्यांचा जीवन प्रवास मला जवळून अनुभवायला मिळाला. आता त्यांच्या एकूणच कारकिर्दीबद्दल मंगला कपूर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ही अभिमानाची बाब आहे. ‘मंगला’ चित्रपटाच्या संपूर्ण टीम कुठून आणि माझ्याकडून माझी प्राध्यापक मंगला कपूर यांना खूप शुभेच्छा”.
शिक्षण, मनोरंजन आणि सामाजिक बदल; अभिनयाच्या पलिकडे जाऊन “क्लाऊलिंग” सारख्या कलेकडे वळले ‘हे’ कलाकार