Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भाईजान… तुस्सी ग्रेट हो!’ सलमानच्या प्रॉपर्टीत वाढ? ‘तो’ फ्लॅट विकला पण नफा मिळवला छ्प्परफाड

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील त्याच्या मालकीचा फ्लॅट ३.५० कोटी रुपयांना विकला असून, या व्यवहाराची सध्या चर्चा रंगली आहे. २०१५ मध्ये २.८८ कोटी रुपयांना खरेदी केलेला हा फ्लॅट विकून सलमानने सुमारे ६२ लाख रुपयांचा नफा मिळवला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 11, 2026 | 07:22 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • या व्यवहारामुळे त्याच्या गुंतवणुकीत झालेल्या नफ्याचीही चर्चा सुरू झाली आहे.
  • या व्यवहारानुसार प्रति चौरस फूट किंमत सुमारे ४६ हजार रुपये इतकी ठरली आहे.
  • सध्या तो आणखी एका अॅक्शन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, यावेळी कारण त्याचा आगामी चित्रपट नसून मुंबईतील रिअल इस्टेट व्यवहार आहे. सलमानने वांद्रे पश्चिम येथील त्याच्या मालकीचा एक फ्लॅट ३.५० कोटी रुपयांना विकला असून, ९ जुलै २०२६ रोजी या व्यवहाराची अधिकृत नोंदणी करण्यात आली. या व्यवहारामुळे त्याच्या गुंतवणुकीत झालेल्या नफ्याचीही चर्चा सुरू झाली आहे.

Samantha Ruth Prabhu : घटस्फोटानंतर पहिल्यांदाच Ex-नवऱ्याच्या कुटुंबाबाबत बोलली अभिनेत्री! अखिलसाठी शेअर केली विशेष पोस्ट

वांद्रे पश्चिम येथील शिव-अस्थान हाइट्स या निवासी इमारतीतील हा फ्लॅट सलमानने २०१५ मध्ये २.८८ कोटी रुपयांना खरेदी केला होता. तब्बल ११ वर्षांनंतर त्याने हा फ्लॅट ३.५० कोटी रुपयांना विकला असून, त्यातून सुमारे ६२ लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. ७५८ चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळ असलेल्या या फ्लॅटसोबत दोन कार पार्किंगची सुविधाही आहे. या व्यवहारानुसार प्रति चौरस फूट किंमत सुमारे ४६ हजार रुपये इतकी ठरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा फ्लॅट मुनीरा अकबरअली दांडावाला, महदिअली अकबरअली दांडावाला आणि झहरा महदिअली दांडावाला यांनी संयुक्तपणे खरेदी केला आहे. या व्यवहारासाठी २१ लाख रुपयांचा मुद्रांक शुल्क आणि ३० हजार रुपयांचे नोंदणी शुल्क भरण्यात आले. मात्र, या व्यवहाराबाबत सलमान खान किंवा खरेदीदारांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

सुप्रसिद्ध अभिनेत्याने अल्पवयीन मुलीला केली मारहाण! ‘या’ मालिकांमध्ये झळकला होता चेहरा, आता तुरुंगाआड

दरम्यान, सलमान खान आजही कुटुंबासह वांद्रे येथील प्रसिद्ध गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहे. त्याचबरोबर त्याच्या आई सलमा खान यांच्या नावावर समुद्रालगत नव्या निवासी इमारतीच्या प्रस्तावालाही मंजुरी मिळाली आहे. कामाच्या आघाडीवर सलमान लवकरच अपूर्व लाखिया दिग्दर्शित ‘मातृभूमी’ या चित्रपटात झळकणार असून, दिग्दर्शक वामशी पैडीपल्ली आणि निर्माता दिल राजू यांच्या पॅन-इंडिया चित्रपटातही तो प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ईद २०२७ मध्ये प्रदर्शित होणार असून, सध्या तो आणखी एका अॅक्शन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Web Title: Salman khan property in bandra is sold for 350 crores

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 07:22 PM

Topics:  

  • property
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Sultan Movie: 10 वर्षांनंतर समोर आलं ‘सुलतान’चं रहस्य; Salman Khanने अवघ्या 15 मिनिटांत चित्रपटासाठी दिला होता होकार
1

Sultan Movie: 10 वर्षांनंतर समोर आलं ‘सुलतान’चं रहस्य; Salman Khanने अवघ्या 15 मिनिटांत चित्रपटासाठी दिला होता होकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.