फोटो सौजन्य - Social Media
Rupali Bhosale : अंगावर जखमा! असं घडलं तरी काय? लपंडाव मालिकेच्या सेटवरील ‘ती’ व्हिडीओ होतेय व्हायरल
विविध हिंदी मालिकांमध्ये झळकणारा रोहित चंदेल हा 29 वर्षीय चेहरा आता तुरुंगांआड आहे. एका अल्पवयीन मुलीचा छळ केल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. फक्त छळ नव्हे तर या 16 वर्षांच्या मुलीने त्यावर पाठलाग केल्याचा आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. सदर घटना मुंबईच्या दहिसर भागामध्ये घडली असून आरोपी अभिनेत्यावर poxo आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरण नेमकं काय आहे, हे जाणून घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 10 जुलै 2026 रोजी, अभिनेत्याला न्यायालयात आणण्यात आले होते. दरम्यान, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
नक्की काय आहे मुद्दा?
तक्रार अशी आहे की 16 वर्षीय मुलगी आणि 29 वर्षीय तरुण अभिनेता रोहित चंदेल एकमेकांच्या परिचयाचे आहेत. दोघांमध्ये 5 जुलै रोजी वाद झाला. रोहितने तिला वारंवार कॉल केला पण मुलीने मात्र ते उचलले नाही. त्यामुळे तापलेल्या रोहितने इतर क्रमांकावरून कॉल करण्यास सुरुवात केली. वादावेळी, रोहितने मुलीला वाटेत अडवलं, ओरडला आणि तिचा पाठलागही केला. त्यामुळे मुलीने जवळील पोलीस स्थानकात जाऊन रोहितविरोधात तक्रार नोंदवली. पुढील प्रक्रियेत पोलीस अधिक माहितीसाठी CCTV Footage पाहणार आहेत तसेच मुलीचा जवाबही नोंदवण्यात येणार आहे.
Mamachya Govyala Jauya : सिनेमाचे आणखीन एक गाणे समोर! ‘या’ तिघडीने केला राडा, ‘डार्लिंग’ ऐकलं का?
‘या’ मालिकांमध्ये झळकला होता अभिनेता!
अभिनेता रोहित चंदेल याने बहुतेक हिंदी मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. सैराब, यम है हम, पांड्या स्टोअर तसेच काशीबाई बाजीराव बल्लाळ या मालिकांमध्ये अभिनेता झळकला होता. परंतु, अल्पवयीन मुलीचा छळ केल्यामुळे अभिनेता सध्या वादात असून देशभरातून बदनामी होत आहे.






