
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अर्पिता खान म्हणाली, “मला आश्चर्य वाटते”
अर्पिताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर माही विजबद्दल एक पोस्ट शेअर केली. तिने लिहिले, “नदीम, जर तुझ्यासारख्या व्यक्तीवरही अत्याचार होऊ शकतो, तर मला आश्चर्य वाटते की आपण कोणत्या जगात राहत आहोत.” नदीमबद्दल सांगायचं झालं तर, नदीम सलमान खानच्या सर्वात चांगल्या मित्रांपैकी एक आहे.
‘बॉर्डर 2’मधील तिसरं गाणं ‘जाते हुए लम्हों’ रिलीज, मात्र सनी देओलच्या चाहत्यांनी व्यक्त केली निराशा
नदीमला अभिनेत्यासोबत अनेक वेळा स्पॉट केले गेले आहे, मग ते भाईजानच्या वाढदिवसानिमित्त असो किंवा कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमात असो. नदीमचे सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाशी चांगले संबंध आहेत. नदीम हा माही विज आणि जय भानुशालीचा चांगला मित्र देखील आहे. या एक्स जोडप्याची मुलगी नदीमला “अब्बा” देखील म्हणते.
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
नदीमच्या वाढदिवसानिमित्त, माही आणि जयची मुलगी तारा हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये लिहिले होते, “वाढदिवसाच्या शुभेच्छा अब्बा.” यामुळे तारा नदीमला “अब्बा” का म्हणत आहे यावर बराच वाद निर्माण झाला. आणि लोकांनी यावर प्रश्न उपस्थित केले. यामुळे माही विजला मोठा त्रास झाला. आणि तिने देखील सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत मौन सोडले.
माहीने मीडियावर केली टीका
यामुळे तिने नुकताच इन्स्टाग्राम एक व्हिडिओ शेअर करून नाराजी व्यक्त केली. माही म्हणाली की ती वर्षानुवर्षे नदीमच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर करत आहे. नदीम तिचा खूप चांगला मित्र आहे. माही म्हणाली की तारा नदीमला “अब्बा” म्हणण्याचा निर्णय तिचा आणि जयचा होता. माही असेही म्हणाली की घाण पसरवणाऱ्या लोकांना लाज वाटायला पाहिजे.