Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baaghi 4: ‘हर आशिक है खलनायक’, ‘बागी 4’ मधील संजय दत्तचा खतरनाक लूक पाहून होईल थरकाप!

टायगर श्रॉफचा हिट चित्रपट बागी याचा चौथा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुधीर बाबू, मनोज बाजपेयी आणि जयदीप अहलावत यांच्यानंतर आता संजय दत्तने बागी 4 मध्ये खलनायकाच्या भूमिकेत प्रवेश केला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 09, 2024 | 12:22 PM
Sanjay Dutt (फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)

Sanjay Dutt (फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

ॲक्शन थ्रिलर बागी फ्रँचायझीच्या पुढील चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. आता या चित्रपटामधील खलनायकाचा चेहराही समोर आला आहे. सिनेविश्वातील खरा ‘खलनायक’ संजय दत्त साजिद नाडियादवालाच्या बागी 4 मध्ये खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. अभिनेत्याचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे, जे पाहून तुमच्या शरीराचा थरकाप होईल. गेल्या महिन्यात टायगर श्रॉफचा आगामी चित्रपट बागी 4 ची घोषणा करण्यात आली होती. आता निर्मात्यांनी आणखी एक सरप्राईज देऊन चाहत्यांना हैराण केले आहे. यावेळी खलनायकी जबरदस्त असेल, कारण संजय दत्तने चित्रपटात प्रवेश केला आहे.

बागी 4 मध्ये संजय दत्तची एन्ट्री
सोमवारी टायगर श्रॉफ आणि साजिद नाडियादवाला यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बागी 4 च्या खलनायकाचे अनावरण केले. त्याने संजय दत्तचे एक जबरदस्त पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये या अभिनेत्याचा लूक पाहून कोणीही दंग होईल. या पोस्टरमध्ये अभिनेता एका खतरनाक लूकमध्ये दिसत आहे. खुर्चीवर एका मुलीचा मृतदेह धरून बसलेला, रक्ताने माखलेला संजय दत्त ओरडताना पोस्टरमध्ये दिसून येत आहे. अभिनेत्याचा हा लुक कोणालाही चकित करून टाकेल असा आहे.

 

या पोस्टरच्या वर ‘प्रत्येक प्रियकर हा खलनायक असतो’ असे कॅप्शन लिहिले आहे. या पोस्टर आणि कॅप्शनवरून असे दिसते की, प्रेम गमावल्यानंतर अभिनेता खलनायक बनतो. या चित्रपटात संजय दत्तच्या एन्ट्रीने प्रेक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. चाहत्यांना आता हा चित्रपट पाहण्याची आतुरला लागून राहिली आहे.

चाहत्यांच्या मिळाल्या प्रतिक्रिया
एका यूजरने फायर इमोजीसह लिहिले, “काय होणार आहे. यावेळी माझे मन आतुरले आहे.” दुसऱ्याने लिहिले: “वाह, शक्तिशाली.” एकजण म्हणाला, “अरे देवा. यावेळी मोठा धमाका होणार आहे.” एका युजरने आधीच हा चित्रपट ब्लॉकबस्टर असल्याचे घोषित केले आहे. एका युजरने खलनायकाच्या भूमिकेत संजय दत्तचे वर्णन केले आहे. इतर वापरकर्ते देखील फायर आणि हार्ट इमोजीसह बागी 4 चा नवीन खलनायक पसंत करत आहेत. चित्रपट रिलीज आधीच चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Pushpa 2 Box Office: राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला ‘पुष्पराज’, या देशात केली जबरदस्त कमाई!

चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
साजिद नाडियादवाला निर्मित, बागी 4 चे दिग्दर्शन ए. हर्ष करत आहेत. बागी फ्रँचायझीचा हा चौथा चित्रपट आहे. हा चित्रपट 5 सप्टेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. आतापर्यंत फक्त टायगर आणि संजयचे लूक समोर आले आहेत. हिरोईनबाबत अजूनही सस्पेन्स ठेवण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये कोणती अभिनेत्री काम करणार हे पाहणे उत्कंठाचे ठरणार आहे.

Web Title: Sanjay dutt joins tiger shroff in baaghi 4 check out the first look and release date as the villain here

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2024 | 12:22 PM

Topics:  

  • Sanjay Dutt
  • tiger shroff

संबंधित बातम्या

हरनाज संधू आणि टायगरच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन, ‘Baaghi 4’ मधील पहिलं गाणं रिलीज!
1

हरनाज संधू आणि टायगरच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन, ‘Baaghi 4’ मधील पहिलं गाणं रिलीज!

‘बागी ४’ च्या सेटवर मोठी दुर्घटना; १२ फूटच्या उंचीवरून खाली पडले दोन कलाकार, रुग्णालयात दाखल
2

‘बागी ४’ च्या सेटवर मोठी दुर्घटना; १२ फूटच्या उंचीवरून खाली पडले दोन कलाकार, रुग्णालयात दाखल

टायगर श्रॉफच्या ‘Baaghi 4’ चा टीझर प्रदर्शित, टायगर श्रॉफ दिसणार अ‍ॅक्शन मोडमध्ये
3

टायगर श्रॉफच्या ‘Baaghi 4’ चा टीझर प्रदर्शित, टायगर श्रॉफ दिसणार अ‍ॅक्शन मोडमध्ये

टायगर श्रॉफच्या ‘बागी ४’ च्या टीझरला मिळाले ‘A’ प्रमाणपत्र, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
4

टायगर श्रॉफच्या ‘बागी ४’ च्या टीझरला मिळाले ‘A’ प्रमाणपत्र, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.