
टायगर श्रॉफ हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर; इंदूरमधून आणखी एकाला पोलिसांनी केली अटक
टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबारात याच पिस्तुलांचा वापर केल्याचा पोलिसांना संशय आहे. हल्ल्यानंतर पळून जाताना आरोपींनी ही शस्त्रे सुरतमध्ये लपवून ठेवल्याची माहिती आहे. दोन्ही पिस्तुले आणि काडतुसे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. त्यांचा बॅलिस्टिक अहवाल घटनास्थळावरून मिळालेल्या रिकाम्या काडतुसांशी पडताळला जाईल. १८ ऑक्टोबरला संध्याकाळी सातच्या सुमारास जुहू येथे टायगरच्या कारवर गोळीबार झाला होता.
दरम्यान, या प्रकरणात तिघांना दुसऱ्याच दिवशी राजस्थानमधील कोटा रेल्वेस्थानकावरून अटक करण्यात आली. फूलसिंग, ऋतिक आणि रेहान अशी त्यांची नावे आहेत. ते जयपूर आणि दिल्लीमार्गे नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होते.
सलमानच्या स्तुतीमुळे टायगर हल्ला?
अभिनेता टायगर श्रॉफवर करण्यात आलेल्या गोळीबारामागे अभिनेता सलमान खान यांच्याशी असलेल्या संबंधांचा मुद्दा असल्याचा दावा अटक करण्यात आलेल्या एका शूटरने केला आहे. २०२२ मध्ये चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान टायगरने सलमान खान यांची स्तुती केल्यामुळे लॉरेन्स बिश्नोई गँग त्याच्यावर नाराज होती आणि त्याचा बदला घेऊ इच्छित होती, असे शूटरने पोलिसांना सांगितल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
टायगर श्रॉफचा खारमधील फ्लॅट ९ कोटींना विकला
अभिनेता टायगर श्रॉफने मुंबईतील खार पश्चिम येथील अपार्टमेंट ९ कोटी रुपयांना विकले. रुस्तमजी पॅरामाउंट सोसायटीच्या नवव्या मजल्यावरील या फ्लॅटचे क्षेत्रफळ १२९१ चौरस फूट आहे. टायगरने जुलै २०१८ मध्ये हा फ्लॅट ७.६१ कोटी रुपयांना खरेदी केला होता.
FAQ
Ans: तीन संशयित शूटर्सना राजस्थानमधील कोटा येथून अटक करण्यात आल्याचे वृत्तात नमूद आहे. याशिवाय हरियाणातील सोनीपत आणि दिल्लीमध्येही या प्रकरणाशी संबंधित कारवाई करण्यात आली आहे.
Ans: गोळीबारामागील हेतू, शस्त्रांचा पुरवठा, आरोपींमधील संपर्क आणि लॉरेन्स बिश्नोई गँगशी कथित संबंध या बाबींचा तपास सुरू असल्याचे वृत्तात म्हटले आहे.